शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
3
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
4
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
5
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
6
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
7
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
8
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
9
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
10
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
11
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
12
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
13
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
14
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
15
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
16
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
17
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
18
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
19
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
20
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
Daily Top 2Weekly Top 5

'लव्ह जिहाद' रोखणे उत्तर प्रदेश भाजपच्या बैठकीचा अजेंडा

By admin | Updated: August 23, 2014 12:47 IST

'लव्ह जिहाद'च्या माध्यमातून हिंदूचे जबरदस्तीने करण्यात येणा-या धर्मांतराचा मुद्दा उत्तर प्रदेश भाजपच्या बैठकीचा अजेंडा असणार आहे.

ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. २३ -  'लव्ह जिहाद'च्या माध्यमातून हिंदूचे जबरदस्तीने करण्यात येणा-या धर्मांतराचा मुद्दा उत्तर प्रदेश भाजपच्या अजेंड्यावर असून शनिवारपासून सुरू होणा-या भाजपच्या राज्यस्तरीय समितीच्या बैठकीत या मुद्यावर चर्चा होणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असलेल्या 'धर्म जागरण मंच' या संघटनेने सुरू केलेल्या मोहिमेनंतर आता भाजपने हे पाऊल उचलले आहे. शनिवापासून मथुरा येथे होणा-या या बैठकीचे भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून या बैठकीस उत्तर प्रदेशातील पक्षाचे राष्ट्रीय नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत २०१७ सालच्या विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाची रणनीतीही आखण्यात येणार आहे. 'लव्ह जिहाद'च्या माध्यमातून विवाहासाठी हिंदू मुलींचे धर्मांतर करून त्यांना मुसलमान बनवण्यात येत असल्याचा आरोप या संघटनेतर्फे करण्यात आला होता.
राज्यातील कायदा व सुव्यवस्थेचे वातावरण या मुद्यावरील चर्चेदरम्यान 'लव्ह जिहाद' आणि 'हिंदूंच्या धर्मांतराच्या' मुद्यावरही चर्चा होणार असून भविष्यात या समस्यांशी लढण्याची योजनाही या बैठकीदरम्यान ठरवण्यात येणार असल्याचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मीकांत वाजपेयी यांनी सांगितल. तसेच सहारणपूर, मोरादाबाद, मीरत आणि आंबेडकर नगर येथे झालेल्या जातीय हिसांचाराबाबतही या बैठकीत चर्चा होणार आहे, असे ते म्हणाले.
'लव्ह जिहाद' विरोधात लढणे हा आत्तापर्यंत फक्त संघाचा अजेंडा होता, मात्र केंद्रात सत्तेवर आल्यानंतर भाजपनेही या मुद्यात लक्ष घालत त्या विरोधात आवाज उठवणे सुरू केले आहे. 
फैजाबाद येथे एका मुसलमान तरूणाने एका हिंदू तरूणीची हत्या करण्यात आली होती, याबाबतची माहिती वाजपेयींनी उत्तर प्रदेशच्या दौ-यावर आलेल्या अमित शहा यांना दिली होती. हे प्रकरण 'लव्ह जिहाद' अंतर्गतच येत असल्याची शंका स्थानिक नेत्यांना होती.