शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

विविध एजन्सींचे एक्झिट पोल याआधी ठरले होते खोटे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2019 11:00 AM

२००४ आणि २००९ मधील एक्झिट पोलच्या अंदाजावर पाणी फेरले गेले होते. त्यावेळी एक्झिट पोलच्या सर्वच एजन्सीं तोंडघशी पडले होते .

मोसिन शेख 

मुंबई - शेवटचा टप्पा संपताच माध्यमांमध्ये विविध एजन्सींनी केलेल्या एक्झिट पोलची निरीक्षणं बाहेर येऊ लागले आहेत. प्रत्यक्षात मात्र निवडणुकीच्या निकालानंतर सर्व चित्र स्पष्ट होतील. माध्यमांमध्ये एक्झिट पोलची दिली जाणारी आकडेवारी आणि प्रत्यक्ष निकालाचे चित्र पूर्णपणे वेगळंही असू शकतं. एक्झिट पोलचे अंदाज सपशेल आपटल्याची अनेक उदाहरणे आहेत. २००९ मधील एक्झिट पोल याचा उत्तम उदाहरण ठरले आहेत. त्याव्येतिरिक्त ही अनेकदा एक्झिट पोल खोटी ठरली असल्याचे इतिहास आहे.

लोकसभा निवडणुकीच्या शेवटचा टप्प्यात रविवारी मतदान संपताच, माध्यमांमध्ये एक्झिट पोलचा धडका सुरु आहे. आलेल्या सर्व पोलनुसार एनडीए सरकार बनवेल असे दाखवले जात आहे. तर यूपीएला पुन्हा विरोधकाच्या भूमिकेत बसण्याची वेळ येणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. २०१४ ला एक्झिट पोलचे बहुतांश अंदाज खरे ठरले पण त्याआधीच्या सलग दोन लोकसभा निकालांआधी हे अंदाज सपशेल आपटले. २००४ आणि २००९ मधील एक्झिट पोलच्या अंदाजावर पाणी फेरले गेले होते. त्यावेळी एक्झिट पोलच्या सर्वच एजन्सीं तोंडघशी पडले होते .

२००४ मधील लोकसभा निवडणुकीनंतर एजन्सींनी केलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार एनडीएला २२५ जागांवर तर यूपीएला १८३ ठिकाणी विजय मिळवता येईल असा अंदाज वर्तवला गेला होता. प्रत्यक्षात आलेला निकाल वेगळा होता. एनडीएला २२५ चा अंदाज असताना त्यांना १८९ ठिकाणी विजय मिळवता आला. भाजपला फक्त १३८ जागा मिळाल्या होत्या. यूपीएला १८३ जागांचा अंदाज एक्झिट पोलने दाखवला होता. प्रत्यक्षात, मात्र त्याच यूपीएचे २२२ खासदार निवडून आले होते. त्यामुळे २००४ मध्ये एजन्सींनी केलेल्या एक्झिट पोलचे सर्व अंदाज चुकले होते.

२००४ प्रमाणेच २००९ मधील परिस्थिती एक्झिट पोलची पहायला मिळाली होती. २००९ मधील लोकसभा निवडणुकीत एजन्सींनी केलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार यूपीएला १९९ आणि एनडीएला १९७ जागांवर विजय मिळवता येईल असा अंदाज वर्तवला होता. प्रत्यक्षात यूपीएला २६२ आणि एनडीएला १५९ ठिकाणी विजय मिळवता आला होता. एक्झिट पोलच्या अंदाज यावेळी खोटा ठरला होता तर यूपीएच्या जागा प्रचंड वाढताना पहायला मिळाल्या होत्या.

२०१८ मध्ये छत्तीसगढमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सरासरी ४० जागांवर विजय मिळेल तर कॉंग्रेसचे ४६ आमदार निवडणून येतील असा अंदाज एजन्सींनी केलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीतून समोर आले होते. निकाल हाती आल्यानंतर कॉंग्रेसला ६८ तर भाजपला १५ जागांवर विजय मिळवता आला होता. यावेळीही एक्झिट पोलची आकडेवारी खोटी ठरली होती. त्यामुळे २०१९ लोकसभा निवडणुकीतील एजन्सींच्या एक्झिट पोलचे आकडे कितपत खरे ठरणार हे २३ रोजीच्या निकालानंतर स्पष्ट होईल.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha 2019 Exit Pollलोकसभा निवडणूक एक्झिट पोलLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालElectionनिवडणूक