पुन्हा 'सैराट' भीती, जीव वाचविण्यासाठी जोडपं लपून बसलं जंगलात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 15:39 IST2018-09-24T15:31:55+5:302018-09-24T15:39:32+5:30

जंगलात लपून बसलेल्या जोडप्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये मुलीने तिच्या आणि तिच्या पतीच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले

Again 'Sairaat' fears, couples hiding in the forest to save lives in telangana | पुन्हा 'सैराट' भीती, जीव वाचविण्यासाठी जोडपं लपून बसलं जंगलात

पुन्हा 'सैराट' भीती, जीव वाचविण्यासाठी जोडपं लपून बसलं जंगलात

हैदराबाद - तेलंगणाच्या जनगाव येथून मिळालेल्या माहितीनुसार येथील जंगलात एक जोडपे आपला जीव वाचविण्यासाठी लपून बसले आहेत. विशेष म्हणजे या जोडप्याने आंतरजातीय विवाह केला आहे. त्यामुळे समुदायातील आपल्याच लोकांकडून आपला जीव वाचविण्यासाठी या जोडप्याने चक्क जंगलात लपून बसण्याचा निर्णय घेतला आहे.

जंगलात लपून बसलेल्या जोडप्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये मुलीने तिच्या आणि तिच्या पतीच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे. दोन महिन्यांपूर्वी या मुलीने आपल्या प्रियकरासोबत विवाह केला आहे. विवाहानंतर हे जोडपे हैदराबाद येथे राहात होते. मात्र, मुलीच्या आई-वडिलांना या दोघांचा पत्ता मिळाल्यानंतर त्यांनी तेथून पलायन केलं. विशेष म्हणजे जीव वाचविण्यासाठी ते चक्क नेल्लूरच्या कवाली येथील जंगलात राहत आहेत. 

दरम्यान, जनगाव येथील रेड्डी समुदायाची ही मुलगी आहे. तर मुलगा ऐरुकल्ला समुदायाचा असल्याची माहिती आहे. मुलीचे कुटुंबीय या लग्नास तयार नव्हते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वीच तेलंगणात घडलेल्या सैराटसारख्या हत्याकांडामुळे या जोडप्यानेही धसाका घेतला असून जंगलात राहणे पसंत केलं. तर काही दिवसांपूर्वीच यांना पोलिसांनी एका लॉजवर पकडले होते. त्यानंतर, पोलिसांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी हे जोडपे जंगलात लपून बसले आहे. 

Web Title: Again 'Sairaat' fears, couples hiding in the forest to save lives in telangana