लग्नाच्या तीन वर्षांनंतर पतीला पत्नीचे प्रेमसंबंध असल्याचे समजले, प्रियकराला बोलावले अन्…
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 14:19 IST2022-12-17T14:19:42+5:302022-12-17T14:19:52+5:30
बिहारमधील भागलपूरमध्ये एक अनोखी प्रेमकहाणी समोर आली आहे. एका पतीने पत्नीला तिच्या प्रियकराच्या ताब्यात दिल्याचे समोर आले आहे.

लग्नाच्या तीन वर्षांनंतर पतीला पत्नीचे प्रेमसंबंध असल्याचे समजले, प्रियकराला बोलावले अन्…
बिहारमधील भागलपूरमध्ये एक अनोखी प्रेमकहाणी समोर आली आहे. एका पतीने पत्नीला तिच्या प्रियकराच्या ताब्यात दिल्याचे समोर आले आहे. लग्नाच्या तीन वर्षांनंतर पत्नीचे लग्नापूर्वी दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचे पतीला समजले. आणि लग्नानंतरही बायको त्याला विसरु शकली नाही म्हणून पतीने प्रियकराला बोलावून बायकोचा हात तिच्या हातात दिला. पतीने आपल्या 12 महिन्यांच्या मुलीलाही पत्नीच्या स्वाधीन केले. सध्या भागलपूरच्या या अनोख्या प्रेमकथेची खूप चर्चा सुरू आहे.
हे प्रकरण बिहारमधील भागलपूरच्या सबौर ब्लॉकमधील फारका गावाशी संबंधित आहे. येथील श्रीकांत कुमार मंडल यांचा विवाह तीन वर्षांपूर्वी राजंदीपूर गावातील जिच्छा देवीसोबत झाला होता. विवाहापूर्वी विशेष कुमार ठाकूरसोबत तिचे प्रेमसंबंध होते.
लग्न झाल्यानंतरही या दोघांत प्रेमसंबंध होते. पत्नीचे दुसऱ्या कोणाशी तरी अफेअर असल्याने पती-पत्नीमधील वाद वाढत गेले. एक दिवस पत्नीने सर्व प्रकार पती श्रीकांत मंडलला सांगितला.तिने पतीसमोर हात जोडून सांगितले की, तिचे प्रियकर विशेष कुमारवर प्रेम आहे आणि तिला त्याच्यासोबत राहायचे आहे. यानंतर पतीने पत्नीच्या प्रियकराला बोलावून पत्नीचा हात त्याच्या हाती दिला. यासोबतच पतीने आपल्या 18 महिन्यांच्या चिमुरडीलाही पत्नीजवळ दिले.
आत्याची हत्या करून लुटली 1 कोटी पेक्षा जास्त कॅश आणि दागिने, प्रेयसीसोबत परदेशात होणार होता शिफ्ट
पतीने पत्नीला प्रियकराच्या ताब्यात दिल्यानंतर शुक्रवारी पती, पत्नी आणि प्रियकराने नातेवाईकांसह सबूर पोलीस ठाणे गाठले. येथे त्याने पोलिसांसमोर पती-पत्नीमधील घटस्फोट आणि कोर्ट मॅरेजबाबत संदर्भात माहिती दिली. पती-पत्नी परस्पर संमतीने वेगळे झाले. पत्नी पतीचे घर सोडून आपल्या माहेरच्या राजंदीपूर येथे गेली.