पाकिस्तान पुरस्कृत पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत आक्रमक पावित्र्यात दिसत आहे. भारतीय हवाई दलाने ‘Aakraman’ एक्सरसाइज अथवा सराव सुरू केला आहे. हा सराव केंद्रीय सेक्टर मध्ये सुरू आहे. या युद्धाभ्यासात राफेल आणि सुखोई Su-30 सारखी प्रगत लढाऊ विमानेही भाग घेत आहेत. भारतीय हवाई दलाचे दोन राफेल स्क्वाड्रन अम्बाला आणि हाशीमारा (पश्चिम बंगाल) येथे आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे जेट्स मल्टीपल एअरबेसवरून तैनात करण्यात आली आहेत. या मोहिमांमध्ये ग्राउंड अॅटॅक, इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि हाई-स्पीड टारगेट डिस्ट्रक्शन सारख्या गोष्टींचा समावेश आहे.
महत्वाचे म्हणजे, भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असताना भारतीय हवाई दलाचा हा सराव सुरू आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, पाकिस्तान फुसक्या धमक्या देताना दिसत आहे. मात्र, आता शब्दाने नाही, तर शक्तीशाली कृतीतून उत्तर मिळेल, हे भारताने स्पष्ट केले आहे.
भारतीय हवाई दलाचे टॉप पायलट्स सरावात सहभागी -या सरावात भारतीय हवाईदलाचे टॉप गन पायलट्स देखील भाग घेत आहेत. यांच्यावर हाय-क्वालिफाइड इंस्ट्रक्टर्स लक्ष ठेऊन आहेत. महत्वाचे म्हणजे, मेटिओर मिसाइल, रॅम्पेज आणि रॉक्स सारख्या लांब पल्ल्यांच्या मिसाइल्समुळे भारताची ताकद वाढली आहे. हे मिसाईल्स शत्रूच्या एअरबोर्न अर्ली वॉर्निंग सिस्टिमलाही चकवू शकतात.
महत्वाचे म्हणजे, 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर, भारताने मिराज-2000 च्या सहाय्याने बालाकोट स्ट्राइक केले होते. मात्र आता भारतीय हवाई दलाकडे, राफेल, सुखोई, आणि S-400 एअर डिफेन्स सारखी शस्त्रास्त्रे आहेत. यांमुळे संपूर्ण दक्षिण आशियामध्ये भारताची शक्ती अनेक पटीने वाढते.