शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दारुण पराभवानंतर सोनिया गांधी आक्रमक, पाच राज्यातील काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना दिले राजीनाम्याचे आदेश  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 19:45 IST

Congress News: पाच राज्यातील दारुण पराभवानंतर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आक्रमक झाल्या असून, त्यांनी .या पराभवाची समीक्षा करत मोठा निर्णय घेतला आहे. सोनिया गांधी यांनी पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमधील काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत.

नवी दिल्ली - नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यात काँग्रेसला हातात असलेले पंजाब हे राज्य गमवावे लागले. तर गोवा आणि उत्तराखंडमध्ये सत्ता मिळवण्याची संधी गमवावी लागली. उत्तर प्रदेशमध्येही काँग्रेसला ४०३ पैकी केवळ २ जागांवर यश मिळाले. या दारुण पराभवानंतर काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आक्रमक झाल्या असून, त्यांनी .या पराभवाची समीक्षा करत मोठा निर्णय घेतला आहे. सोनिया गांधी यांनी पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमधील काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत.

काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत यासंदर्भातील माहिती दिली आहे. ते म्हणाले की, काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूरमधील पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना राजीनामा देण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान,  पंजाबमधील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासह इतर चार राज्यातील काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांना राजीनामे द्यावे लागणार आहेत.

पाच राज्यातील निवडणुकीमध्ये काँग्रेसची कामगिरी अगदी सुमार झाली होती. पंजाबमध्ये आपच्या लाटेमध्ये काँग्रेसचा सफाया झाला. तिथे पक्षाला केवळ १८ जागा मिळाल्या. तर उत्तराखंडमध्येही काँग्रेसला केवळ १९ जागांवर समाधान मानावे लागले. गोव्यात काँग्रेसला ११ तर उत्तर प्रदेशमध्ये केवळ २ आणि मणिपूरमध्ये पाच जागांवर काँग्रेसला समाधान मानावे लागले.  

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीPunjab Assembly Election Results 2022पंजाब विधानसभा निवडणूक निकाल २०२२