शहरं
Join us  
Trending Stories
1
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
2
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
3
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
4
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
5
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
6
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
7
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
8
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
9
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
10
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
11
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
12
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
13
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
14
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
15
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
16
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
17
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
18
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
19
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
20
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
Daily Top 2Weekly Top 5

तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2025 19:15 IST

"मी एक मोठा गुन्हा केला, मी माझ्या कुटुंबाकडे, माझ्या तीन मुलांकडे लक्ष दिले नाही. माझी किडनी दान करताना मी माझ्या पतीची किंवा माझ्या सासरच्यांची परवानगी घेतली नाही. माझ्या देवाला, माझ्या वडिलांना वाचवण्यासाठी, मी ते केले, जे आज घाणेरडे म्हटले गेले. तुम्ही माझ्यासारखी चूक कधीही करू नका, कुणाच्याही घरात रोहिणीसारखी मुलगी होऊ नये."

बिहार विधानसभा निवडणुकीतील दारून पराभवानंतर, लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आला आहे. त्यांच्या घरात मोठी फूट पडल्याचे दिसत आहे. तेजप्रताप यादव, रोहिणी आचार्य आदी कुटुंबातील सदस्य तेजस्वी यादव आणि त्यांचे निकटवर्तीय संजय यादव यांच्यावर नाराज आहेत. शनिवारी लालू-राबडी यांच्या निवासस्थानी तेजस्वी यादव यांनी पराभवासाठी थेट बहिण रोहिणी यांनाच जबाबदार धरले, एवढेच नाही तर त्यांच्यावर चप्पलही फेल्याचे बोलले जात आहे. या घटनेनंतर या कुटुंबातील भांडण आता आता थेट रस्त्यावर आले आहे.

'तुझी हाय लागली, म्हणूनच आम्ही निवडणूक हरलो' -एनडीटीव्हीने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी दुपारी तेजस्वी आणि रोहिणी यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. तेजस्वी यांनी रोहिणी यांना पराभवासाठी जबाबदार धरले. एवढेच नाही तर, 'तुझी हाय लागली, म्हणूनच आम्ही निवडणूक हरलो' असेही ते म्हणाले. तेजस्वी एवढ्यावरच थांबले नाही, तर त्यांनी या वादादरम्यान रोहिणी यांच्यावर थेट चप्पलही फेकली, यामुळे रोहिणी प्रचंड दुखावल्या गेल्या.

या घटनेनंतर रोहिणी यांनी 'एक्स'वर पोस्ट करत, राजकारण सोडण्याची आणि कुटुंबाशी संबंध तोडण्याची घोषणा केली. संजय आणि रमीज यांनी आपल्याला हेच करायला सांगतिले आहे. मी संपूर्ण दोष घेते. यानंतर, रात्री पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, "माझे आता कोणीही कुटुंब नाही. तेजस्वी, संजय आणि रमीज यांना जाऊन विचारा. जबाबदारी घ्यायची नसल्याने त्यांनीच मला कुटुंबातून बाहेर काढले आहे. संजय, रमीज यांचे नाव घ्याल, तर घरातून काढले जाईल, बदनाम केले जाईल आणि चप्पल फेकूण मारली जाईल.

रोहिणी यांनी पुन्हा रविवारीही एक पोस्ट केली, यात त्या म्हणाल्या, आपल्याला शिवीगाळ करत 'घाणेरडी' म्हटले गेले आणि मी माझ्या वडिलांना माझी घाणेरडी किडनी दिली. त्यासाठी कोट्यवधी रुपये घेतले आणि तिकीट घेतले,' असे म्हटले गेले.

कुणाच्याही घरात रोहिणीसारखी मुलगी होऊ नये -दरम्यान, दुखावलेल्या रोहिणी यांनी सर्व विवाहित महिलांना एक सल्ला दिला आहे, त्या म्हणाल्या, "मी सर्व विवाहित मुली आणि बहिणींना सांगू इच्छिते की, तुमच्या आई-वडिलांच्या घरात मुलगा किंवा भाऊ असेल, तर तुमच्या देवासारख्या वडिलांना चुकूनही वाचवू नका, आपला भाऊ किंवा त्या घरातील मुलालाच सांगा की, की त्याने किंवा त्याच्या हरियाणवी मित्राची किडनी द्यावी. मुलींनी त्यांच्या घराची आणि कुटुंबाची, त्यांच्या मुलांची, त्यांच्या कामाची, त्यांच्या सासरच्यांची काळजी घ्यावी, त्यांच्या पालकांची काळजी न घेता, केवळ स्वतःचा विचार करावा. मी एक मोठा गुन्हा केला, मी माझ्या कुटुंबाकडे, माझ्या तीन मुलांकडे लक्ष दिले नाही. माझी किडनी दान करताना मी माझ्या पतीची किंवा माझ्या सासरच्यांची परवानगी घेतली नाही. माझ्या देवाला, माझ्या वडिलांना वाचवण्यासाठी, मी ते केले, जे आज घाणेरडे म्हटले गेले. तुम्ही माझ्यासारखी चूक कधीही करू नका, कुणाच्याही घरात रोहिणीसारखी मुलगी होऊ नये.

English
हिंदी सारांश
Web Title : Tejashwi blamed sister Rohini for defeat, threw slipper: Inside story!

Web Summary : Bihar's election loss fuels Yadav family feud. Tejashwi blamed Rohini, allegedly throwing a slipper. Rohini announced severing ties, citing betrayal and insults after donating her kidney to their father. She advises women to prioritize their families.
टॅग्स :Tejashwi Yadavतेजस्वी यादवLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवBiharबिहार