बंगालमध्ये ईडी टीमवर झालेल्या हल्ल्यानंतर काँग्रेस-भाजप एकत्र! एनआयए तपासाची केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 03:39 PM2024-01-05T15:39:27+5:302024-01-05T15:41:17+5:30

आज सकाळी बंगालमध्ये ईडीच्या टीमवर हल्ला झाला. या हल्ल्यात अधिकारी जखमी झाले आहेत.

After the attack on the ED team in Bengal, Congress-BJP together NIA probe demanded | बंगालमध्ये ईडी टीमवर झालेल्या हल्ल्यानंतर काँग्रेस-भाजप एकत्र! एनआयए तपासाची केली मागणी

बंगालमध्ये ईडी टीमवर झालेल्या हल्ल्यानंतर काँग्रेस-भाजप एकत्र! एनआयए तपासाची केली मागणी

बंगालमधील रेशन घोटाळ्याप्रकरणी छापा टाकण्यासाठी आलेल्या ईडीच्या पथकावर आज हल्ला झाला. या हल्ल्यात ईडीचे अनेक अधिकारी जखमी झाले, अनेक अधिकाऱ्यांच्या डोक्यालाही इजा झाली. आता या हल्ल्याचा भाजपने आणि काँग्रेसनेही निषेध केला आहे.

दरम्यान, भाजपने ईडी टीमवरील हल्ल्याचा निषेध करत ममता सरकारवर टीका केली आहे. बंगाल भाजपच्या अध्यक्षा सुकांता मजुमदार यांनी या घटनेची चौकशी करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्रही लिहिले आहे. सुकांता यांनी या हल्ल्याची एनआय चौकशीची मागणी केली आहे.

काँग्रेसचा अपेक्षाभंग? क्राऊड फंडिंगमधून जमले फक्त ११ कोटी; हायकमांड टेन्शनमध्ये

काँग्रेसनेही ममता बॅनर्जी यांना घेरले

दुसरीकडे या हल्ल्यानंतर काँग्रेसनेही भाजपसोबत एका आवाजात ममता सरकारवर हल्लाबोल केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी म्हणाले की, आज ज्या प्रकारे सत्ताधारी पक्षाच्या गुंडांनी ईडी अधिकाऱ्यांवर हल्ला केला, त्यावरून एक दिवस ईडी अधिकाऱ्यांचीही हत्या होऊ शकते, हे स्पष्ट होते.

भाजप नेते सुकांता मजुमदार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून म्हटले आहे की ,बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्था संपली आहे आणि ईडी टीमवरील हल्ल्यावरून हे दिसून येते की कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी काम करणाऱ्या लोकांना लक्ष्य केले जात आहे आणि ते स्वतः सुरक्षित नाहीत. यासाठी या घटनेची एनआयएमार्फत चौकशी करण्यात यावी.

पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांनीही या घटनेबाबत निवेदन जारी केले आहे. ही भयंकर घटना असल्याचे सांगून ते म्हणाले की, ही चिंताजनक आणि निषेधार्ह आहे. राज्यपाल म्हणाले की, लोकशाहीत रानटीपणा रोखणे हे सुसंस्कृत सरकारचे कर्तव्य आहे आणि जर सरकारने आपले मूलभूत कर्तव्य पार पाडले नाही तर राज्यघटना आपला मार्ग स्वीकारेल. मी योग्य कारवाईसाठी माझे सर्व घटनात्मक पर्याय राखून ठेवतो, असंही त्यांनी यात म्हटले आहे.

Web Title: After the attack on the ED team in Bengal, Congress-BJP together NIA probe demanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.