दहा महिन्यांनंतरही लागला नाही निकाल पोस्टमन परिक्षा : आऊट सोर्सचा परिणाम, तरुण हवालदिल

By Admin | Published: February 1, 2016 12:03 AM2016-02-01T00:03:58+5:302016-02-01T00:03:58+5:30

पुणे : पोस्टमन आणि एमटीएस या पदासाठी टपाल खात्याने गेल्या वर्षी मार्च आणि मे महिन्यात परिक्षा घेतल्या़ या परिक्षा घेणे व त्याचे निकाल लावण्यासाठी टपाल खात्याने आऊट सोर्स केला, पण खासगी सेवा घेऊनही टपाल खात्याला गेल्या १० महिन्यात या परिक्षांचे निकाल लावता आलेले नाही़ फोन, ई मेल, प्रत्यक्ष भेटी घेऊनही टपाल कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी कोणतीही दाद देत नाही़ गेल्या अनेक महिन्यांपासून पुढील महिन्यात निकाल लागेल, असे सांगून वेळ मारुन नेत असल्यामुळे नोकरीच्या आशेने ही परिक्षा देणारे हजारो तरुण हवालदिल झाले आहेत़

After ten months, no result postman examination: outcome of out source, young hawk | दहा महिन्यांनंतरही लागला नाही निकाल पोस्टमन परिक्षा : आऊट सोर्सचा परिणाम, तरुण हवालदिल

दहा महिन्यांनंतरही लागला नाही निकाल पोस्टमन परिक्षा : आऊट सोर्सचा परिणाम, तरुण हवालदिल

googlenewsNext
णे : पोस्टमन आणि एमटीएस या पदासाठी टपाल खात्याने गेल्या वर्षी मार्च आणि मे महिन्यात परिक्षा घेतल्या़ या परिक्षा घेणे व त्याचे निकाल लावण्यासाठी टपाल खात्याने आऊट सोर्स केला, पण खासगी सेवा घेऊनही टपाल खात्याला गेल्या १० महिन्यात या परिक्षांचे निकाल लावता आलेले नाही़ फोन, ई मेल, प्रत्यक्ष भेटी घेऊनही टपाल कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी कोणतीही दाद देत नाही़ गेल्या अनेक महिन्यांपासून पुढील महिन्यात निकाल लागेल, असे सांगून वेळ मारुन नेत असल्यामुळे नोकरीच्या आशेने ही परिक्षा देणारे हजारो तरुण हवालदिल झाले आहेत़
टपाल कार्यालयांचे आधुनिकीकरणाची योजना शासनाने हाती घेतली आहे़ त्यासाठी कोअर बँकिगही सुरु करण्यात आले आहे़ यासाठी प्रामुख्याने टपाल खात्याला मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे़ त्यासाठी पोस्टमनच्या ७०० आणि एमटीएस कर्मचार्‍यांचे १ हजार पदे भरण्यासाठी मार्च व मे २०१४ मध्ये परिक्षा घेण्यात आली़ केंद्र शासनाच्या नोकरीची संधी मिळत असल्याने या परिक्षेला राज्यभरातून हजारो तरुणांनी प्रतिसाद दिला़ ही परिक्षा घेण्याची व तिच्या उत्तरपत्रिका तपासून निकाल जाहीर करण्यासाठी टपाल खात्याने आऊटसोर्स करुन हे काम खासगी कंपनीकडे सोपविले़ त्यानंतर आतापर्यंत टपाल खात्याकडून कोणतीही माहिती उमेदवारांना दिली जात नाही़ मुंबईतील मुख्य पोस्टमास्टर जनरल यांच्या कार्यालयाकडे राज्यभरातील उमेदवार फोन, ई मेल व प्रत्यक्ष भेटून चौकशी करतात़ पण, त्यांना लवकरच निकाल जाहीर करण्यात येईल, असे सांगितले जाते़
महाराष्ट्र मंडलाचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल अशोककुमार दास यांनी या परिक्षेचा निकाल एक महिन्यात जाहीर केला जाईल, असे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सांगितले होते़ त्याला आता २ महिने होऊन गेले तरी अजूनही हा निकाल कधी जाहीर करणार याची नेमकी तारीख टपाल खात्याकडून दिली जात नाही़ यापूर्वी मुख्य पोस्ट मास्तर जनरल यांच्या कार्यालयातून २ ते ३ आठवड्यात निकाल जाहीर होईल, असे कळविण्यात आले होते़ दर वेळी पुढील महिन्यात निकाल जाहीर होणार असे सांगितले जात असल्याने त्यावर कसा विश्वास ठेवायचा असा प्रश्न या उमेदवारांना पडला आहे़
़़़़़़़
निकालास आणखी एक महिना
परिक्षेचा निकाल जाहीर करण्याचे काम आऊटसोर्स करण्यात आले असून निकाल जाहीर करण्यास अजून एक महिना लागणार आहे़
एस़ एल़ परब, सहायक संचालक (पोस्टल सर्व्हिसेस, भर्ती)

Web Title: After ten months, no result postman examination: outcome of out source, young hawk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.