शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

एकला चलो रे! काँग्रेस उत्तर प्रदेशातील सर्व जागा लढवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2019 15:08 IST

सपा-बसपा आघाडीची घोषणा झाल्यानंतर काँग्रेसचा निर्णय

लखनऊ: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीनं आघाडी केल्यानंतर एकट्या पडलेल्या काँग्रेसनं सर्वच्या सर्व जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशातील सर्वच्या सर्व 80 मतदारसंघात आम्ही निवडणूक लढवू आणि या निवडणुकीचा निकाल आश्चर्यचकीत करणारा असेल, असं काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी पत्रकारांना संबोधित करताना म्हटलं. काँग्रेसनं उत्तर प्रदेशात 'एकला चलो रे'ची भूमिका घेतली आहे. मात्र काँग्रेसमधील काही नेते माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे काका शिवपाल यादव यांच्या संपर्कात असल्याची माहिती राजकीय सूत्रांनी दिली. (सविस्तर वृत्त लवकरच)काल समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीनं आघाडीची घोषणा केली. दोन्ही पक्ष प्रत्येकी 38 जागा लढवणार असल्याची माहिती मायावती आणि अखिलेश यादव या उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्र्यांनी दिली. मात्र या दोन्ही पक्षांनी अमेठी आणि रायबरेली हे दोन मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याचा निर्णय घेतला. यानंतर आज काँग्रेसचे महासचिव आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेस उत्तर प्रदेशात स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली. या निवडणुकीचे निकाल आश्चर्यजनक असतील, असा दावादेखील त्यांनी केला. आगामी निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपामध्ये देशभरात मुख्य लढत होईल आणि त्यासाठी पक्षानं जोरदार तयारी सुरू केली आहे, असं आझाद म्हणाले. आम्हाला महाआघाडी करायची होती. मात्र त्यांना आमची साथ नको होती. आता आम्ही सर्व जागा लढवण्यास तयार आहोत. आम्ही पूर्ण तयारी केली असून भाजपाला हरवण्यासाठी जो पक्ष आमच्या सोबत येईल, त्याचं आम्ही स्वागतच करू, असं म्हणत आझाद यांनी काँग्रेस इतर पक्षांसाठी हातमिळवणी करण्यास तयार असल्याचे संकेत दिले. 2009 च्या निवडणुकीच्या तुलनेत दुप्पट जागा जिंकण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 2009 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं उत्तर प्रदेशात 21 जागा जिंकल्या होत्या.समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टीकडून काँग्रेसला महाआघाडीत स्थान देण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि बसपाच्या सर्वेसर्वा मायावतींनी काल पत्रकार परिषद घेत या शक्यतांना पूर्णविराम दिला. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं स्वबळावर 80 जागा लढवण्याचा निर्णय घेतला. 

टॅग्स :congressकाँग्रेसUttar Pradeshउत्तर प्रदेशRahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Bahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBJPभाजपा