शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
3
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
4
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
5
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
6
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
7
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
8
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
9
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
10
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
11
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
12
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
13
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
14
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
15
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
16
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
17
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
19
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
20
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा

श्रीरामानंतर श्रीकृष्णही कोर्टात, मथुरेतील मंदिराशेजारील मशीद हटवण्याबाबतची याचिका न्यायालयाने स्वीकारली

By बाळकृष्ण परब | Published: October 16, 2020 7:20 PM

shri krishna janmabhoomi News : श्रीकृष्ण जन्मस्थान प्रकरणी श्रीकृष्ण विराजमान आणि रंजना अग्निहोत्री यांच्यासह आठ जणांकडून जिल्हा न्यायाधीशांच्या कोर्टात दाखल केली आहे

ठळक मुद्देमथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीच्या प्रांगणात असलेली मशीद हटवण्यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका मथुरा जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांनी स्वीकारलीया याचिकेवर १८ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहेया याचिकेवर जिल्ह्या न्यायालयात खटला चालणार

मथुरा - अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयात लागल्यानंतर आता मथुरेमधील श्रीकृष्ण जन्मभूमीचा विषय ऐरणीवर आला आहे. मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीच्या प्रांगणात असलेली मशीद हटवण्यासाठी दाखल करण्यात आलेली याचिका मथुरा जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांनी स्वीकारली आहे. आता या याचिकेवर १८ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थळाशेजारी असलेली याचिका हटवण्याची मागणी या याचिकेमधून केली आहे. आता या याचिकेवर जिल्ह्या न्यायालयात खटला चालणार आहे.मथुरेमध्ये श्रीकृष्ण जन्मभूमीबाबत दाखल याचिका न्यायाधीशंनी स्वीकारली आहे. आता श्रीकृष्ण जन्मभूमीशेजारील शाही मशीद हटवण्याच्या मागणीबाबत प्रतिवादी पक्षाला नोटीस जारी होणार आहे. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर वादी पक्षाचे वकील विष्णू जैन यांनी माहिती दिली. या प्रकरणाची ही सुनावणी १८ नोव्हेंबर २०२० रोजी होणार आहे.श्रीकृष्ण जन्मस्थान प्रकरणी श्रीकृष्ण विराजमान आणि रंजना अग्निहोत्री यांच्यासह आठ जणांकडून जिल्हा न्यायाधीशांच्या कोर्टात दाखल केलेल्या याचिकेप्रकरणी विरोधी पक्षांना नोटीस जारी करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी सिव्हिल जज सिनियर यांच्या डिव्हिजन कोर्टात श्रीकृष्ण जन्मस्थान सेवासंघ आणि शाही मशीद ईदगाह कमिटीदरम्यान, १९६८ मध्ये झालेला करार रद्द करून मशिदीला हटवण्याची आणि सर्व जमीन श्रीकृष्ण जन्मभूमी ट्रस्टला सोपवण्याची मागणी करण्यात आली होती.दरम्यान, ३० सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत सिव्हील जज सिनियर डिव्हिजनच्या न्यायालयाने भक्तांना दावा दाखल करण्याचा अधिकार नाही, असे सांगत ही याचिका फेटाळून लावली होती. आज या प्रकरणी जिल्हा न्यायाधीशांच्या कोर्टात सुनावणी झाली होती. या सुनावणीनंतर अपील स्वीकारण्याल आले. दरम्यान या प्रकरणात आपला दावा मजबूत असल्याचे वादी पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन यांनी सांगितले.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCourtन्यायालय