शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
2
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
3
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
4
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
5
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला FAKE व्हिडीओ; निवडणूक आयोगाकडून होणार कायदेशीर कारवाई
6
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
7
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
8
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
9
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
10
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
11
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
12
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
13
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
14
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
15
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
16
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
17
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
18
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
19
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
20
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 

शरजील इमामनंतर या तरुणीच्या वक्तव्यावरून वादंग, अफझल गुरू निर्दोष असल्याचा केला दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2020 12:32 PM

केंद्र सरकारने लागू केलेला नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि विचाराधीन असलेल्या एनआरसीवरून सध्या देशातील वातावरण पेटलेले आहे.

नवी दिल्ली - केंद्र सरकारने लागू केलेला नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि विचाराधीन असलेल्या एनआरसीवरून सध्या देशातील वातावरण पेटलेले आहे. दिल्लीतील शाहीन बागसारख्या ठिकाणी सुरू झालेल्या आंदोलनामुळे सरकारवरील दबाव वाढत आहे. दरम्यान, या आंदोलनात सहभागी होत असलेल्या मंडळींकडून करण्यात येत असलेल्या प्रक्षोभक वक्तव्यांमुळे वादास तोंड फुटत आहे. एकीकडे शरजील इमामने आसामसह पूर्वोत्तर भारत देशाच्या मुख्य भागापासून वेगळे करण्याचा मनसुबा व्यक्त करणाऱ्या केलेल्या विधानावरून वाद झाला असतानाच आता शाहीन बाग येथील आंदोलनातील अजून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयप्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत कुख्यात दहशतवादी अफझल गुरू हा निर्दोष असल्याचा दावा केला आहे.

शाहीनबागमधील आंदोलनात प्रजासत्ताक दिन, मध्यरात्रीच सुरू झाला सोहळाहिंसा कुठल्याच समस्येचं समाधान नाही, 'मन की बात'मधून शांतीचा संदेश युवकांनी अहिंसक मार्गाने लढा द्यावा, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आवाहनभाजपा नेते संबित पात्रा यांनी यासंदर्भातील एक व्हिडीओ ट्विट केला आहे. ''आता त्या नापाक शरजील इमामनंतर या बाई काय म्हणताहेत तेही ऐका. आमचा कुणावरही विश्वास नाही, सर्वोच्च न्यायालयावरसुद्धा विश्वास नाही. अफझल गुरू निर्दोष होता. रामजन्मभूमीवर मशीद बांधायची होती. मित्रानो एवढी विषाची शेती या काही दिवसांत तर झालेली नाही?'' असा सवाल संबित पात्रा यांनी उपस्थित केला आहे. 

  या व्हिडीतओत दिसत असलेली तरुणी म्हणते की, आम्ही सीएए आणि एनआरसीमुळे आंदोलनात उतरलो आहोत. आम्ही केवळ त्याच्याविरोधात आंदोलन सुरू केलेले नाही. आता आम्ही सरकारवर विश्वास ठेवू शकत नाही, ना सर्वोच्च न्यायालयावर विश्वास ठेवू शकत. सर्वोच्च न्यायालयाने अफझल गुरू याला देशातील कलेटिक्टिव्ह कॉन्शससाठी फाशीवर चढवले. आता अफझल गुरूचा संसदेवरील हल्ल्यात कुठलाही हात नसल्याचे समोर आले आहे. कोर्ट एकदा सांगते की बाबरी मशिदीच्या खाली मंदिर नव्हते. मशिदीचे ताळे तोडणे चुकीचे होते. मशीद पाडणे चुकीचे होते. मात्र नंतर सांगते की त्या ठिकाणी मंदिर बनणार,''

तत्पूर्वी शाहीन बाग येथील आंदोलनाशी संबंधित असलेल्यांनी आपल्या आंदोलनाचा कुणीही नेता नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच शरजील इमामशी आपला कुठलाही संबंध नसल्याचे सांगितले होते. तसेच शरजील इमाम याने शाहीन बाग येथे हे विधान केले नव्हते, असाही दावा या मंडळींनी केला आहे. तसेच शाहीन बाग येथील आंदोलन हे महिला करत असून, शरजील याचे त्याच्याशी काहीही घेणे देणे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकIndiaभारत