सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 17:24 IST2025-09-18T17:22:51+5:302025-09-18T17:24:18+5:30
मध्य प्रदेशमधील पन्ना जिल्ह्यातील जमीन ही तिच्या पोटात सापडणाऱ्या मौल्यवान हिऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथे हिऱ्यांचा शोध घेण्यासाठी आणि आपलं नशीब आजमावण्यासाठी येत असतात.

सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं
मध्य प्रदेशमधील पन्ना जिल्ह्यातील जमीन ही तिच्या पोटात सापडणाऱ्या मौल्यवान हिऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथे हिऱ्यांचा शोध घेण्यासाठी आणि आपलं नशीब आजमावण्यासाठी येत असतात. दरम्यान, अशाच एका मोलमजुरी करणाऱ्या गरीब महिलेचं इथे नशीब चमकलं आहे. रचना गोलदार नावाच्या या महिलेला आठवडाभरात तब्बल आठ हिरे सापडले आहेत. या महिलेला सापडलेल्या आठ हिऱ्यांपैकी सहा हिरे हे जेम्स क्वालिटीचे आहेत. आता हे हिले लिलावात ठेवले जाणार असून, तिथे त्यांचा लिलाव होईल. लिलावातून येणाऱ्या रकमेपैकी ठरावीक रक्कम या महिलेला मिळेल.
रचना गोलदार ही अत्यंत सामान्य मोलमजुरी करणारी णहिला आहे. तिने आपलं नशीब आजमावण्यासाठी हीरा कार्यालयातून परवागनी घेऊन हजार मुद्रा क्षेत्रामध्ये खोदकामास सुरुवात केली होती. जवळपास आठवडाभर अविरत कष्ट उपसल्यानंतर या या महिलेला सुमारे आठ हिरे सापडले. त्यापैकी सहा हिरे हे जेम्स क्वालिटीचे आहेत. त्याचं एकूण वजन २.५३ कॅरेट एवढं आहे. यामधील सर्वात मोठा हिरा हा ०.७९ कॅरेटचा आहे. इतर दोन हिरे हे ऑफ कलर आहेत. हिरेतज्ज्ञांनी या हिऱ्यांच्या गुणवत्तेला दुजोरा देताना त्यांची किंमत ही लाखो रुपयांमध्ये असल्याचे म्हटले आहे.