संक्रांतीनंतर बिहारमध्ये पुन्हा एकदा सत्तापरिवर्तन; नितीश कुमार महाआघाडीत येणार : यादव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 09:07 IST2025-01-04T09:06:22+5:302025-01-04T09:07:04+5:30

पप्पू यादव म्हणाले की, यावेळी पीके मॉडेल अंतर्गत भाजप नितीशच्या जागा कमी करणार आहे.  त्यानंतर ते नितीशकुमार यांना संपविणार आहेत...

After Sankranti, there will be another change of power in Bihar; Nitish Kumar will join the grand alliance: Yadav | संक्रांतीनंतर बिहारमध्ये पुन्हा एकदा सत्तापरिवर्तन; नितीश कुमार महाआघाडीत येणार : यादव 

संक्रांतीनंतर बिहारमध्ये पुन्हा एकदा सत्तापरिवर्तन; नितीश कुमार महाआघाडीत येणार : यादव 

एसपी सिन्हा

पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना खुली ऑफर दिल्यानंतर बिहारमध्येराजकारण तापले आहे. यातच पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांनी मकर संक्रांतीनंतर बिहारमध्ये पुन्हा एकदा सत्तापरिवर्तन होईल. नितीश कुमार महाआघाडीत सामील होतील, असा दावा केला आहे. त्यांच्या विधानामुळे चर्चांना पेव फुटले आहे.

लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार एकत्र येत मोठा डाव खेळणार आहेत. नितीश कुमार आणि लालू यादव एकत्र लढले तर २०२५ च्या विधानसभा निवडणुकीत दोघेही जास्त जागा जिंकतील हे  नितीशकुमार आणि लालूप्रसाद यादव यांना माहीत आहे, असे ते म्हणाले.

पप्पू यादव म्हणाले की, यावेळी पीके मॉडेल अंतर्गत भाजप नितीशच्या जागा कमी करणार आहे.  त्यानंतर ते नितीशकुमार यांना संपविणार आहेत.
 

Web Title: After Sankranti, there will be another change of power in Bihar; Nitish Kumar will join the grand alliance: Yadav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.