कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर आता या नेत्यांची नावे मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2021 05:09 PM2021-09-18T17:09:21+5:302021-09-18T17:10:15+5:30

Punjab Politics: काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रिपद सोडण्याचे स्पष्ट आदेश दिल्याने पंजाबच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

After the resignation of Capt. Amarinder Singh, the names of these leaders are now in the forefront for the post of Chief Minister | कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर आता या नेत्यांची नावे मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर 

कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर आता या नेत्यांची नावे मुख्यमंत्रिपदासाठी आघाडीवर 

Next

चंदिगड - काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रिपद सोडण्याचे स्पष्ट आदेश दिल्याने पंजाबच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. एएनआयने सूत्रांनी दिलेल्या हवाल्याने सांगितले की, आज काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीपूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दुपारी दोन वाजता आमदारांची एक बैठक बोलावली होती. अमरिंदर यांचा राजीनामा झाल्यानंतर आता मुख्यमंत्रिपदासाठी तीन नेत्यांची नावे आघाडीवर आहेत. (After the resignation of Capt. Amarinder Singh, the names of these leaders are now in the forefront for the post of Chief Minister)

पंजाबमध्ये काँग्रेस आमदारांच्या गटाच्या महत्त्वपूर्ण बैठकीपूर्वी पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांच्या नावावर चर्चा सुरू झाली आहे. तेच पंजाबचे भावी मुख्यमंत्री होतील अशी चर्चा आहे. सुनील जाखड यांनी राहुल गांधी यांचे ट्विट करून कौतुक केले होते. वाह राहुल गांधी तुम्ही खूप गुंतागुंतीचा बनलेला तिढा सोडवला आहे. आश्चर्यजनकपणे नेतृत्वाने घेतलेल्या या निर्णयामुळे पंजाब काँग्रेसमधील वाद मिटवला आहे. या निर्णयाने कार्यकर्ते मंत्रमुग्ध झाले आहेत. तसेच या निर्णयाने अकालींचा पाया उखडून टाकला आहे.

पंजाब काँग्रेसचे महासचिव परगट सिंह यांनी सांगितले की, कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पदावरून हटण्याचे आदेश देण्यात आले आहे. अंबिका सोनी, सुनील जाखड आणि अन्य एक नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत ज्येष्ठ नेत्या अंबिका सोनी यांचे नावही आघाडीवर आहे. यूपीएस सरकारमध्ये त्या माहिती आणि प्रसारणमंत्री होत्या.

या दोन्ही नेत्यांसोबत नवज्योत सिंग सिद्धू यांचे नावही आघाडीवर आहे. सिद्धू जर कुठल्याही प्रतिस्पर्धी पक्षात गेल्यास त्यामुळे काँग्रेसला नुकसान होऊ शकते. पंजाबचा मुख्यमंत्री बनण्याची सिद्धूची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही. सिद्धूंमुळेच पंजाबमध्ये हा विवाद झाला होता. त्यामुळे त्यांचे नाव मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आहे.  

Web Title: After the resignation of Capt. Amarinder Singh, the names of these leaders are now in the forefront for the post of Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app