'ऑपरेशन सिंदूर'नंतर दहशतवादी पुन्हा घुसखोरी करण्याच्या तयारीत, पत्रकार परिषदेत बीएसएफकडून मोठा खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 15:35 IST2025-05-27T15:34:04+5:302025-05-27T15:35:54+5:30

ऑपरेशन सिंदूरमध्ये शत्रू सैन्याच्या चौक्या कशा उद्ध्वस्त केल्या आणि त्यांचे मनसुबे कसे हाणून पाडले, याची माहिती बीएसएफ अधिकाऱ्यांनी दिली.

After 'Operation Sindoor', terrorists are preparing to infiltrate again, BSF makes a big revelation in the press conference! | 'ऑपरेशन सिंदूर'नंतर दहशतवादी पुन्हा घुसखोरी करण्याच्या तयारीत, पत्रकार परिषदेत बीएसएफकडून मोठा खुलासा!

'ऑपरेशन सिंदूर'नंतर दहशतवादी पुन्हा घुसखोरी करण्याच्या तयारीत, पत्रकार परिषदेत बीएसएफकडून मोठा खुलासा!

ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय सीमा सुरक्षा दलाने मंगळवारी जम्मू आणि काश्मीरमध्ये पत्रकार परिषद घेतली. ऑपरेशन सिंदूरमध्ये शत्रू सैन्याच्या चौक्या कशा उद्ध्वस्त केल्या आणि त्यांचे मनसुबे कसे हाणून पाडले, याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तसेच, येत्या काळातील दहशतवाद आणि दहशतवादी हल्ले यावर भारतीय सैन्याची तयारी कशी आहे, यावर देखील भाष्य केलं. "ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे. कारण आपण पाकिस्तानवर विश्वास ठेवू शकत नाही", असे जम्मू फ्रंटियरचे बीएसएफ महानिरीक्षक शशांक आनंद यावेळी म्हणाले.

'ऑपरेशन सिंदूर'नंतर सीमा सुरक्षा दलाने आंतरराष्ट्रीय सीमेवरील सुरक्षेत कोणतीही कसर सोडलेली नाही. या सीमांवरून दहशतवाद्यांची घुसखोरी होण्याची भीती असून, सीमा सुरक्षा दल त्यासाठी हाय अलर्टवर असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

पाकिस्तानवर विश्वास ठेवू शकत नाही!
या पत्रकार परिषदेत बोलताना आयजी म्हणाले की, "पाकिस्तानवर विश्वास ठेवू शकत नाही, म्हणून ऑपरेशन सिंदूर अजूनही चालू आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफ पूर्णपणे सज्ज आणि सतर्क आहे. सहाय्यक कमांडंर नेहा भंडारी यांच्यासह बीएसएफ महिला कर्मचाऱ्यांनी महत्त्वाच्या चौक्यांवर तैनात होऊन अनुकरणीय धैर्य दाखवले आहे. ऑपरेशन सिंदूरनंतरही सीमेवरून घुसखोरी होण्याची शक्यता असल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. मात्र, या सगळ्यांना रोखण्यासाठी आम्ही सज्ज आहोत."

सियालकोट सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबाराच्या आडून सीमा ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयित दहशतवाद्यांच्या घुसखोरीचा मोठा प्रयत्न बीएसएफने यशस्वीरित्या उधळून लावला, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान भारताच्या हल्ल्यांपुढे पाकिस्तानला गुडघे ठेकावे लागले. या दरम्यान दहशतवादी तळे नाहीशी झालीच, पण पाकिस्तानलाही मोठे नुकसान आले. शत्रूने माघार घेतली असली, तरी सीमेपलीकडून गोळीबार आणि त्या आड घुसखोरीचे प्रयत्न सुरू असल्याचे, त्यांनी यावेळी सांगितले.

Web Title: After 'Operation Sindoor', terrorists are preparing to infiltrate again, BSF makes a big revelation in the press conference!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.