हृदयद्रावक! आधी सासू-सासरे अन् आता २९ वर्षीय नवऱ्याचा मृत्यू; घरात एकटीच राहिली सून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 14:15 IST2025-07-15T14:14:58+5:302025-07-15T14:15:44+5:30

२९ वर्षीय क्लार्क इशांत सिंहचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

after mother father 29 year old son ishant singh- died meerut collectorate clerk heart attack case | हृदयद्रावक! आधी सासू-सासरे अन् आता २९ वर्षीय नवऱ्याचा मृत्यू; घरात एकटीच राहिली सून

फोटो - आजतक

मेरठ जिल्हाधिकारी कार्यालयात तैनात असलेल्या २९ वर्षीय क्लार्क इशांत सिंहचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. इशांतचे आईवडील आधीच वारले होते आणि आता त्यांचा एकुलता एक मुलगाही जग सोडून गेला. कुटुंबात फक्त इशांतची पत्नी एकटीच राहिली आहे. त्याला १२ तासांत दोनदा हार्ट अटॅक आला. 

मिळालेल्या माहितीनुसार, इशांत सिंह हा कलेक्टर ऑफिसच्या इंग्रजी रेकॉर्ड विभागात क्लार्क म्हणून काम करत होता. काही वर्षांपूर्वी त्याच्या आईच्या निधनानंतर त्याला नोकरी मिळाली. त्याच्या वडिलांचंही आधीच निधन झालं होतं. पाच वर्षांपूर्वी त्याचं लग्न झालं होतं. तो त्याच्या पत्नीसोबत कलेक्टर ऑफिसच्या आवारात असलेल्या सरकारी निवासस्थानी राहत होता.

कुटुंब आणि कार्यालयाशी संबंधित लोकांनी सांगितलं की, रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास इशांतच्या छातीत खूप दुखू लागलं. कुटुंब आणि ओळखीच्या लोकांनी त्याला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात नेलं, जिथे प्राथमिक तपासणी, ईसीजी आणि काही चाचण्या करण्यात आल्या. डॉक्टरांनी त्याला काही वेळ विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आणि घरी पाठवलं. 

सोमवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास इशांत नेहमीप्रमाणे बाथरूममध्ये गेला. त्यानंतर अचानक त्याला पुन्हा छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या आणि तो तिथेच पडला. पडण्याचा आवाज ऐकून त्याची पत्नी ताबडतोब बाथरूमकडे धावली आणि दार वाजवलं, पण कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. घाबरून तिने जवळच्या शेजाऱ्यांना बोलावलं. शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला आणि इशांतला बाहेर काढून ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले, जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

इशांतच्या मृत्यूने सर्वांनाच मोठा धक्का बसला. त्याची पत्नी आता घरात एकटीच राहिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांनी सांगितलं की, इशांत हा अतिशय शांत, साधा आणि जबाबदार व्यक्ती होता. तो त्याच्या जबाबदाऱ्या पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडत असे आणि कधीही कोणाशीही मोठ्या आवाजात बोलताना दिसला नाही.
 

Web Title: after mother father 29 year old son ishant singh- died meerut collectorate clerk heart attack case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.