चंद्र आणि सूर्य मिशननंतर आता भारताचं 'समुद्रयान'; काय आहेत या योजनेची उद्दिष्टे?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2023 12:23 PM2023-09-12T12:23:56+5:302023-09-12T13:00:35+5:30

NIOT मत्स्य ६००० आधी एक पर्सनल स्फेअर यान बनवले होते. जे ५०० मीटर समुद्राच्या खोलीपर्यंत जाऊ शकते.

After Moon and Sun Mission, now India's 'Sumadrayan'; What are the objectives of MATSYA 6000? | चंद्र आणि सूर्य मिशननंतर आता भारताचं 'समुद्रयान'; काय आहेत या योजनेची उद्दिष्टे?

चंद्र आणि सूर्य मिशननंतर आता भारताचं 'समुद्रयान'; काय आहेत या योजनेची उद्दिष्टे?

googlenewsNext

नवी दिल्ली  - पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे मंत्री किरेन रिजिजू यांनी ११ सप्टेंबरला ट्विट करून पुढील मिशन समुद्रयान (Samudrayaan) असल्याचे सांगितले. चेन्नईच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नोलॉजीत हे बनवले जात आहे. यामाध्यमातून ३ मानव समुद्राच्या ६००० मीटर खोलीत पाठवले जाईल. जेणेकरून तेथील स्त्रोत आणि जैव विविधतेची स्टडी करता येऊ शकते.

मंत्री किरेन रिजिजू यांनी म्हटलं की, या प्रोजेक्टमुळे समुद्राच्या इकोसिस्टमवर कुठलेही नुकसान होणार नाही. हे एक डीप मिशन आहे, ज्यातून ब्ल्यू इकोनॉमी विकसित करण्यावर भर दिला जाईल. समुद्रातील खोलीत काय दडलंय हे शोधता येईल. यातून अनेकांना रोजगार मिळेल. कारण समुद्रातील संसाधनांचा वापर करता येऊ शकतो. एकीकडे ISRO चंद्रयान ३, गगनयान आणि सूर्य मिशनसारखे अंतराळ मिशन साध्य करत आहे. तर दुसरीकडे भारत आता समुद्रातील खोलीत काय दडलंय त्याचा शोध घेत आहे.

NIOT मत्स्य ६००० आधी एक पर्सनल स्फेअर यान बनवले होते. जे ५०० मीटर समुद्राच्या खोलीपर्यंत जाऊ शकते. पर्सनल स्फेअरमध्ये एक व्यक्ती बसण्याची क्षमता होती. हे २.१ मीटर व्यास असलेली गोलाकार पाणबुडी होती. जी माइल्ड स्टीलपासून बनवली होती. त्याची चाचणी बंगालच्या खाडीत सागर निधी जहाजातून केली होती. जेव्हा हे मिशन यशस्वी झाले तेव्हा समुद्रयान प्रकल्पाला ग्रीन सिग्नल मिळाला आहे.  

काय आहे समुद्रयान?

समुद्रयान पूर्णपणे स्वदेशी मिशन आहे. हे एक सबमर्सिबल आहे. ज्याचे नाव मत्स्य ६००० ठेवले आहे. हे बनवण्यासाठी टाइटेनियम एलॉयचा वापर करण्यात आला आहे. त्याचा व्यास २.१ मीटर आहे. हे १२ तासांसाठी ३ व्यक्तींना समुद्राच्या ६ हजार मीटर खोलीपर्यंत घेऊन जाऊ शकते. त्यात ९६ तासांची इमरजेन्सी इंड्यूरेंस आहे. याचे सर्व भाग सध्या बनवण्यात येत आहेत. हे मिशन २०२६ पर्यंत लॉन्चिंग होऊ शकते. समुद्रयानाच्या यशस्वी लॉन्चिंगनंतर भारत अमेरिका, रशिया, फ्रान्स, जपान आणि चीनसारख्या देशांच्या इलीट क्लबमध्ये सहभागी होईल. या देशांकडे अशा मिशनसाठी विशेष तंत्रज्ञान आणि वाहन उपलब्ध आहे.

समुद्राच्या आत समुद्रयान काय करणार?

समुद्रयानचे उद्देश समुद्राच्या खोलीत शोध आणि दुर्मिळ खनिजांचे उत्खन्न करण्यासाठी पाणबुडीच्या माध्यमातून व्यक्तीला पाठवणे हे आहे. सामान्यत: पाणबुडी केवळ ३०० ते ४०० मीटर पर्यंत जाते. या प्रोजेक्टसाठी जवळपास ४१०० कोटी खर्च होणार आहे. हे समुद्रातील खोलीत गॅस, हायड्रेट्स, पॉलिमॅटेलिक मॅग्ननीज नॉड्यूल, हाइड्रो थर्मल सेल्फाईड आणि कोबाल्ट क्रस्टसारख्या संसाधनांचा शोध घेण्यासाठी पाठवण्यात येत आहे. या सर्व गोष्टी समुद्राच्या १ हजार ते ५५०० मीटर खोलीत सापडतात.

डीप ओशन मिशन काय आहे?

जून २०२१ मध्ये पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने हे समोर आणले होते. त्याचा उद्देश समुद्रातील खनिजांचा शोध घेणे, समुद्री संसाधनाचा वापर समुद्राच्या खोलीपर्यंत तंज्ञत्रान पाठवणे, भारत सरकार ब्ल्यू इकोनॉमीमध्ये मदत करणे हे आहे.

Web Title: After Moon and Sun Mission, now India's 'Sumadrayan'; What are the objectives of MATSYA 6000?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.