शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

मणिपूरनंतर बंगालमधील खळबळजनक व्हिडीओ व्हायरल; दोन महिलांना जमावाकडून विवस्त्र करून मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2023 18:30 IST

या व्हिडिओमध्ये संबंधित महिलांना लोक मारहाण करताना दिसत आहे...!

ममता बॅनर्जी यांच्या पश्चिम बंगलामध्ये साधारणपणे मनिपूर प्रमाणेच थरकाप उडवणारी घटना घडल्याचा दावा करण्यात आला आहे. पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात याच आठवड्याच्या सुरुवातीला काही लोकांनी दोन महिलांना विवस्त्र करून मारहाण केल्याचा दावा भारतीय जनता पक्षाने (भाजप) शनिवारी केला. ही घटना बुधवारी घडल्याचे बोलले जात आहे. घटनेचा एक कथित व्हिडिओ BJP आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी शनिवारी सोशल मिडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये संबंधित महिलांना लोक मारहाण करताना दिसत आहे. 

अमित मालवीय यांचा TMC वर निशाणा - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या दिवशी संबंधित महिला मालदा जिल्ह्यातील बामनगोला येथील बाजारात आपले सामान विकण्यासाठी गेल्या होत्या आणि लोकांना त्यांच्यावर चोरी केल्याचा संशय होता. मालवीय यांनी ट्विट केले की, "पश्चिम बंगालमध्ये दहशत सुरूच आहे. मालदातील बामनगोला पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाकुआ हाट भागात दोन आदिवासी महिलांना विर्वस्त्र करण्यात आले, त्यांना अमानुष मारहाण करण्यात आली. यावेळी पोलीस मूकदर्शक होऊन केवळ उभे होते. ही भयंकर घटना 19 जुलैच्या सकाळी घडली होती."

एवढेच नाही, तर "संबंधित महिला सामाजिकदृष्ट्या उपेक्षित समुदायातील होत्या आणि एक उन्मादी समूह त्यांच्या जीवावर उठला होता. यात मोठी दूर्घटनाही घडण्याची शक्यता होती. ज्यामुळे ममता बनर्जी यांचे हृदय कळवळायला हवे होते आणि केवल आक्रोश व्यक्त करण्याऐवजी त्यांनी कारवाईही करू शकल्या असत्या. कारण त्या बंगालच्या गृहमंत्रीही आहेत," असेही मालवीय यांनी म्हटले आहे.  

यासंदर्भात माध्यमांसोबत बोलताना राज्याच्या महिला व बाल आरोग्य मंत्री शशी पांजा म्हण्याला, संबंधित महिला आपसात भांडत होत्या. घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यानंतर या महिला स्वतःहूनच तेथून निघून गेल्या.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालCrime Newsगुन्हेगारी