चालकाचे नियंत्रण सुटल्याने उसाच्या शेतात घुसला ट्रॅक्टर
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:14+5:302015-02-14T23:52:14+5:30

चालकाचे नियंत्रण सुटल्याने उसाच्या शेतात घुसला ट्रॅक्टर
>आलेगाव येथील घटना : सुदैवाने जीवितहानी टळलीदेऊळगावराजे : आलेगाव (ता. दौंड) येथे ऊसवाहतूक करणारा रिकामा ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने एका उसाच्या शेतात घुसला. सुदैवाने पहाटेची वेळ असल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, संबंधित शेतकर्याच्या ऊसशेतीचे नुकसान झाले. दौंड शुगरचा कारखान्याचा ट्रॅक्टर दोन ट्राल्यांसह ऊस भरण्यासाठी आलेगाव येथून सिद्धटेक बेर्डी येथे गुरुवारी (दि. १२) पहाटे निघाला होता. पहाटेची वेळ असल्याने चालकाला झोप लागल्याने त्याचा ट्रॅक्टवरील ताबा सुटला आणि ट्रॅक्टर येथील शेतकर्यांच्या २० ते ३० फूट अंतरावरील उसाच्या शेतात घुसला. या वेळी या रस्त्यावर कोणीही नव्हते. परिसरातील ऊसवाहतूक करणारे ट्रॅक्टर क्षमतेपेक्षा जास्त उसाची वाहतूक करतात. तर, काही ट्रॅक्टरचालक रात्रीच्या वेळी मद्यपान करून मोठ्या आवाजात टेपरेकॉर्डर लावतात. परिणामी, परिसरातील ग्रामस्थांना याचा उपद्रव सहन करावा लागत आहे. दोन ते तीन महिन्यांपासून ट्रॅक्टर उलटण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. फोटो ओळ : आलेगाव (ता. दौंड) येथील उसाच्या शेतात घुसलेला ऊसवाहतूक करणारा ट्रॅक्टर. (छायाचित्र : सुभाष कदम) 14022014-िं४ल्लि-12०००गुरुवारी पहाटेची घटना आहे़ सिंगल घ्यावी /फोटो चांगला आहे का ते पाहावे़ फोटोची गरज वाटत नाही़