शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 20:49 IST

केरळ सध्या दुहेरी संकटाचा सामना करत आहे. कोरोनातून सावरण्याचा प्रयत्न करणाऱ्या केरळसाठी हेपेटायटीस हे आणखी एक मोठे आव्हान बनले आहे.

मागील काही दिवसांपासून केरळमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. तर दुसरीकडे आता केरळमध्ये आणखी एक नवीन संकट आले आहे, हेपेटायटीसच्या प्राणघातक प्रादुर्भावामुळे चिंता वाढत आहे. याचा सर्वाधिक परिणाम त्रिशूर जिल्ह्यात दिसून येत आहे, तिथे हेपेटायटीसच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे. आरोग्य विभागाने याबाबत इशारा दिला आहे, लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

त्रिसूर जिल्ह्यात हेपेटायटीसच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी याबाबत लोकांना सूचना दिल्या आहेत. फक्त उकळलेले आणि फिल्टर केलेले पाणी पिण्यास सांगितले आहे. शिळे अन्न खाणे टाळा. विशेषतः हॉटेल्स आणि ढाब्यांना स्वच्छतेची विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा

हेपेटायटीस कसा पसरतो?

केरळमध्ये या संसर्गामागील मुख्य कारण हेपेटायटीस ए आणि ई विषाणू आहे, जो दूषित अन्न आणि पाण्याद्वारे पसरतो. पावसाळा सुरू होणार आहे आणि या काळात रोग पसरण्याचा धोका आणखी वाढतो. हॉटेल्स आणि ढाब्यांना पिण्याचे पाणी व्यवस्थित उकळल्यानंतरच द्यावे आणि गरम पाण्यात थंड पाणी मिसळू नये असे सांगण्यात आले आहे.

हेपेटायटीसची लक्षणे कोणती आहेत?

 हेपेटायटीसचा संसर्ग शरीरात प्रवेश केल्यानंतर, त्याची लक्षणे दिसण्यास १५ ते ६० दिवस लागू शकतात. 

 मुख्य लक्षणे 

ताप आणि शरीरदुखी, थकवा आणि अशक्तपणा, डोकेदुखी आणि मळमळ, डोळे आणि त्वचा पिवळी पडणे, लघवी काळी पडणे. अतिसार जर यापैकी कोणतीही लक्षणे दिसली तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. स्वतःहून औषधे घेणे टाळा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKeralaकेरळ