शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

तिहेरी तलाक, कलम ३७०, कॅबनंतर पुढे काय?; मोदी-शहा करू शकतात मोठा धमाका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2019 3:20 PM

सात महिन्यांमध्ये तीन महत्त्वाकांक्षी आश्वासनं मार्गी लावल्यानंतर अमित शहांचं नवं लक्ष्य निश्चित

नवी दिल्ली: नागरिकत्व सुधारणा विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर झाल्यानंतर त्यावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना स्वाक्षरी केली. त्यामुळे या विधेयकाचं कायद्यात रुपांतर झालं. यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची जोडगोळी आणखी कोणता मोठा निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कलम ३७०, तिहेरी तलाक आणि नागरिकत्व सुधारणा ही तीन महत्त्वाची विधेयकं मंजूर करुन घेण्यात मोदी सरकारला यश आलं आहे. विशेष म्हणजे गेल्या सात महिन्यांमध्ये म्हणजेच मोदी सरकार-२ मध्ये ही तिन्ही विधेयकं मंजूर झाली आहेत. यामध्ये अमित शहांनी मोदींसाठी टास्कमास्टरची भूमिका बजावली. मोदी सरकार २ मध्ये गृह मंत्रालयाची जबाबदारी मिळताच शहांनी कामाचा धडाका लावला आहे. भाजपानं निवडणुकीवेळी दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याची जबाबदारी मोदींनी शहांवर सोपवल्याचं दिसत आहे. तीन महत्त्वाची विधेयकं मंजूर करुन घेण्यात यशस्वी ठरल्यानंतर आता शहा लवकरच समान नागरी कायद्यावर काम सुरू करतील, अशी शक्यता आहे. भाजपानं याबद्दलचं आश्वासन निवडणुकीच्या जाहिरनाम्यात दिलं होतं. भाजपामधील वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या पक्षानं राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीला प्राधान्य दिलं आहे. खुद्द अमित शहांनी याबद्दल भाष्य केलं आहे. यासाठी कायदा करण्याचीदेखील गरज नाही. केवळ एक शासनादेश काढून हे पाऊल उचलण्यात येईल, असं भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं. पश्चिम बंगालमील विधानसभा निवडणुकीच्या आधी याबद्दल पाऊल उचलण्यात येईल, अशी माहिती भाजपामधील वरिष्ठ सूत्रांनी दिली. समान नागरी कायद्याचा आग्रह भाजपानं अनेकदा धरला आहे. समान नागरी कायद्याचा थेट संबंध भाजपाच्या विचारसरणीशी आहे. त्यामुळे हा कायदा भाजपासाठी अतिशय महत्त्वाकांक्षी आहे. सर्वोच्च न्यायालयानंदेखील यावर भाष्य केलं आहे. मोदी सरकार-१ मध्ये समान नागरी कायद्याचा विषय चर्चेत आला होता. मात्र त्यावेळी याबद्दल विधी आयोगानं प्रतिकूल मत नोंदवलं होतं.  

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाNational Register of Citizensराष्ट्रीय नागरिकत्व नोंदयादीtriple talaqतिहेरी तलाक