आमच्याकडून पाकिस्तानला मैत्रीचा हात; पण त्यांच्याकडून विश्वासघात: नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2019 03:35 PM2019-12-22T15:35:47+5:302019-12-22T15:58:26+5:30

'सीएए', 'एनआरसी' हिंसाचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामलीला मैदानावरून विरोधकांवर निशाणा साधला.

After the BJP government came to power in 2014, I invited former Pakistani Prime Minister Nawaz Sharif to swear an oath. | आमच्याकडून पाकिस्तानला मैत्रीचा हात; पण त्यांच्याकडून विश्वासघात: नरेंद्र मोदी

आमच्याकडून पाकिस्तानला मैत्रीचा हात; पण त्यांच्याकडून विश्वासघात: नरेंद्र मोदी

Next

नवी दिल्ली:  भाजपाचे 2014 मध्ये सरकार सत्तेत आल्यानंतर मी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना शपथविधाला आमंत्रण दिले होते. आम्ही नव्याने मित्र म्हणून हात पुढे केला होता. तसेच मी स्वत: लोहोरमध्ये गेलो होतो, परंतु त्या बदल्यात पाकिस्तानकडून आम्हाला धोका मिळाला असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानवर केली आहे. 'सीएए', 'एनआरसी' हिंसाचारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामलीला मैदानावरून विरोधकांवर निशाणा साधला. 

भारताचे जगातल्या अनेक मुस्लिम राष्ट्रांसोबत चांगले संबंध आहेत. तसेच गेल्या 5 वर्षात मुस्लीम देशांनी अनेक भारतीय कैद्यांना सोडलं असल्याचे नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. सुधारित नागरिकत्व कायद्याच्या माध्यमातून पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातील अल्पसंख्यांकांना नवं आयुष्य मिळेल, असं मोदी म्हणाले. 

सुधारित नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी करून पाकिस्तानला संपूर्ण जगासमोर उघडं पाडण्याची संधी आपल्या हातात होती. त्यांच्या देशात अल्पसंख्यांकावर सुरू असलेले अत्याचार जगासमोर नेण्याची संधी होती. मात्र विरोधकांनी ती वाया घालवली. कारण त्यांना देश नव्हे तर पक्ष महत्त्वाचा वाटतो, अशा शब्दांत मोदींनी विरोधकांना लक्ष्य केलं. 

सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन विरोधक जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला. देशात आंदोलनं सुरू असताना काँग्रेसचे नेते शांततेचं आवाहन करत नाहीत. याचा अर्थ त्यांची आंदोलनातील हिंसेला मूकसंमती आहे. सार्वजनिक मालमत्तांवर होणाऱ्या हल्ल्यांना त्यांचा पाठिंबा आहे, असं म्हणत मोदींना काँग्रेसवर तोफ डागली. आंदोलनातील हिंसाचारातून सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केलं जात आहे. करदात्यांचा पैसा वाया घालवला जात आहे. पण यातून काय साधलं जाणार, गरिबांची वाहनं जाळून काय मिळणार, असे प्रश्न मोदींनी विचारले. तुम्हाला माझ्यावर राग काढायचा असल्यास माझे पुतळे जाळा, त्याला जोडे मारा, असं देखील नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. 

Web Title: After the BJP government came to power in 2014, I invited former Pakistani Prime Minister Nawaz Sharif to swear an oath.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.