शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

नोटाबंदीनंतर सेकर रेड्डीकडे नव्या नोटांमध्ये 33 कोटी 60 लाख रुपये कुठून आले ? - राज ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2017 12:59 IST

आठ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर संपूर्ण देश रांगेत उभा होता.

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय का घेतला ? ते मला अजूनही समजलेले नाही.

मुंबई - आठ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर संपूर्ण देश रांगेत उभा होता. सर्वसामान्य लोकांना पैसा मिळत नव्हता. पण एक महिन्याने आठ डिसेंबर 2016 रोजी कर्नाटकातल्या सेकर रेड्डीकडे 2000 च्या नव्या नोटेमध्ये 33 कोटी 60 लाख रुपये सापडले. इतका पैसा रेड्डीकडे आला कुठून ? असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारला आहे. आजतक वृत्तवाहिनीच्या मंथन कार्यक्रमामध्ये बोलताना राज ठाकरेंनी नोटाबंदी, बुलेट ट्रेन, निवडणुकीत भाजपाकडून होणारा पैशांचा वापर या मुद्यांवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर सडकून टीका केली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा निर्णय का घेतला ? ते मला अजूनही समजलेले नाही. जुन्या नोटांमधील 99 टक्के नोटा परत आल्या असे आरबीआय सांगत असेल मग बनावट नोटा, काळा पैसा कुठे गेला ?, नोटाबंदीचा काय उपयोग झाला ? असे सवाल राज यांनी विचारले. 

भाजपाला सध्या भरपूर लोक डोनेशन देतायत या मुलाखतकाराच्या प्रश्नावर त्यांनी देणगी आणि दरोडा यात खूप फरक असतो असे सूचक विधान त्यांनी केले. बुलेट ट्रेनची एक वीट रचू देणार नाही या आपल्या भूमिकेचा त्यांनी पुनरुच्चार केला. देशाची रेल्वे व्यवस्था सुधारण्यासाठी एक लाख कोटींची गरज आहे. मग अस असताना बुलेट ट्रेनसाठी 1 लाख 10 हजार कोटीचं कर्ज का काढायचं? असा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. एका राज्यासाठी संपूर्ण देशावर बुलेट ट्रेनच ओझ कशाला ? असा सवाल राज यांनी विचारला. 

आजच्या घडीला देशात भाजपाकडे भरपूर पैसा आहे. निवडणुकीत भाजपाने अमाप पैसा खर्च केला आहे असे राज म्हणाले. प्रसारमाध्यमांवरही त्यांनी हल्लाबोल केला. पत्रकार, संपादक वेगळे बोलतात, चॅनलच्या मालकांची भाषा वेगळी आहे. चॅनलच्या मालकांचे  हात दगडाखाली  आहेत असे राज ठाकरे म्हणाले.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे