शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत आज मोठी घसरण; १३ दिवसांत Gold ₹११,६२१ आणि Silver ₹३२,५०० नं झाली स्वस्त
4
“उडता भाला कशाला अंगावर घेता, आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला, भाजपाला नाही”; मनसेची टीका
5
टॅक्स स्लॅबमध्ये मोठा बदल होणार? ५० लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर '३०% टॅक्स' नको; उद्योग संघटनेची मोठी मागणी
6
एका 'Kiss' नं रिक्षाचालकाला बनवलं सेलिब्रिटी; २ दिवस फाईव्ह स्टार हॉटेलला राहिला, त्यानंतर...
7
बांधकाम सुरू असलेला रेल्वे पुलावरून क्रेन कोसळली, वाहन चिरडली, दोघांचा जागीच मृत्यू
8
VIRAL : गालावर खळी, डोळ्यात धुंदी.. तरुणीने फारच मनावर घेतलं अन् पुढे काय केलं बघाच! व्हायरल होतोय व्हिडीओ
9
Groww IPO: डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
10
बॉलिंग मशीनने घेतला युवा क्रिकेटपटूचा बळी, सराव करताना चेंडू डोक्याला लागला आणि...
11
मोहम्मद अझरूद्दीन लवकरच घेणार मंत्रिपदाची शपथ; काँग्रेस त्याच्यावर इतकी 'मेहेरबान' का?
12
'इक्कीस'मध्ये अगस्त्य नंदासोबत झळकणारी अभिनेत्री कोण? अक्षय कुमारसोबत आहे कनेक्शन
13
हिरोशिमावर टाकलेल्या बॉम्बपेक्षा १०० पट पॉवरफूल; किती खतरनाक आहे रशियाचा पोसायडॉन? 
14
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
15
देवळात गेल्यावर तुम्ही योग्य पद्धतीने देवाचे दर्शन घेता का? १० महत्त्वाच्या गोष्टी पाळाच!
16
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
17
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
18
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
19
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
20
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर

"कौटुंबिक न्यायालये ही..."; मृत इंजिनिअरच्या आरोपांवर कायदा मंत्रालयाने दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2024 10:59 IST

अतुल सुभाष प्रकरणानंतर न्याय व्यवस्थेविरुद्धचा वाढता रोष पाहता कायदा मंत्रालयाने एका पोस्टमध्ये प्रतिक्रिया दिली आहे.

Atul Subhash Death: बंगळुरुत पत्नीच्या जाचाला कंटाळून अभियंता असलेल्या पतीने गळफास घेऊन जीवन संपवल्याचं प्रकरण चांगलेच तापलं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी अतुल सुभाष नावाच्या अभियंत्याने २४ पानांचे पत्र आणि सुमारे दीड तासाचा व्हिडिओ बनवला होता. ज्यामध्ये त्याने पत्नी आणि सासरच्या मंडळींना आत्महत्येसाठी जबाबदार धरलं. या व्हिडीओमध्ये अतुलने देशातील न्यायव्यवस्था, पोलीस आणि कायद्यात पुरुषांकडे होणाऱ्या दुर्लक्षाबाबतही आपले मत मांडले आहे. याशिवाय त्यांनी जौनपूरच्या कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायाधीशांवरही गंभीर आरोप केले होते. त्यानंतर कायदा मंत्रालयाने याची दखल घेतली आहे.

अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणात कायदा आणि न्याय मंत्रालयाने मंगळवारी प्रतिक्रिया दिली. कौटुंबिक न्यायालयातील प्रकरणे काळजी आणि संवेदनशीलतेने हाताळण्यास वचनबद्ध असल्याचे कायदा मंत्रालयाने म्हटलं आहे. अतुल सुभाष यांच्या आत्महत्येवरून लोकांमध्ये संताप निर्माण झाल्यानंतर मंत्रालयाने भूमिका स्पष्ट केली आहे.

मूळचे उत्तर प्रदेशचे असणारे  अतुल सुभाष हे बंगळुरू येथील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये काम करत होते. बंगळुरूमधील त्यांच्या फ्लॅटमध्ये गळफास लावून त्यांनी आपलं जीवन संपवलं. आत्महत्या करण्याआधी त्यांनी २४ पानी सुसाईड नोट लिहीली होती. यामध्ये त्यांनी पत्नी आणि सासरच्या लोकांवर छळ केल्याचे आणि पत्नीने सेटलमेंटसाठी तब्बल ३ कोटी रुपयांची मागणी केल्याचे आरोप केले होते. यामध्ये सुभाष यांनी कौटुंबिक न्यायालयाच्या कारभारावरही प्रश्न उपस्थित केले होते. न्यायाधीशांनी खटला निकाली काढण्यासाठी ५ लाख रुपये मागितल्याचा आरोप अतुलने केला. तसेच दोन वर्षांत १२० वेळा सुनावणीसाठी कोर्टात जावं लागल्याचा दावा अतुलने केला.

 न्याय व्यवस्थेवरील वाढता आक्रोश लक्षात घेता कायदा मंत्रालयाने एक्स पोस्टमध्ये आपलं म्हणणं मांडले आहे. “कौटुंबिक न्यायालये कुटुंबांमधील विवाद सोडवण्यासाठी एक समर्पित केलेलं व्यासपीठ आहे. लग्न, मुलांचा ताबा आणि वारसाशी संबंधित मुद्दे हे पारंपारिक औपचारिक न्यायालयीन शैलीशिवाय काळजी, संवेदनशीलतेने हाताळले पाहिजेत याचा इथं विचार केला जातो. त्यामुळे वेळेवर आणि उपायांवर लक्ष केंद्रित करा, तसेच कुटुंबांमधील संबंध सुधारण्यासाठी सलोख्याला प्रोत्साहन द्या," असं या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी चार जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये अतुलची पत्नी निकिता सिंघानिया, सासू निशा सिंघानिया, मेहुणा अनुराग सिंघानिया आणि काका सुशील सिंघानिया यांची नावे आहेत. अतुलचा भाऊ विकास कुमार याने बंगळुरूमधील मराठाहल्ली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या आधारावर, पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८, कलम ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :BengaluruबेंगळूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसGovernmentसरकार