एक वर्षानंतर 'कोविड पॉझिटिव्हिटी दर जास्त, NB.1.8.1 व्हेरिएंट वाढले'; WHO ने दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 22:05 IST2025-05-28T22:01:21+5:302025-05-28T22:05:10+5:30

२०२५ च्या सुरुवातीपासून कोरोना व्हेरिएंटच्या ट्रेंडमध्ये थोडा बदल झाला आहे. LP.8.1 व्हेरिएंट कमी होत आहे.

After a year, 'Covid positivity rate high, NB.1.8.1 variant increased WHO warns | एक वर्षानंतर 'कोविड पॉझिटिव्हिटी दर जास्त, NB.1.8.1 व्हेरिएंट वाढले'; WHO ने दिला इशारा

एक वर्षानंतर 'कोविड पॉझिटिव्हिटी दर जास्त, NB.1.8.1 व्हेरिएंट वाढले'; WHO ने दिला इशारा

जागतिक आरोग्य संघटनेने कोविड-19 विषाणूच्या पुन्हा वाढत्या रुग्णांबाबत चिंता व्यक्त केली आहे. WHO च्या मते, फेब्रुवारी २०२५ च्या मध्यापासून जगभरात SARS-CoV-2 विषाणूमध्ये वाढ नोंदवली जात आहे. WHO च्या आकडेवारीनुसार, कोविड चाचण्यांमध्ये सकारात्मकता दर ११% पर्यंत पोहोचला आहे, तो जुलै २०२४ नंतरचा सर्वाधिक आहे, यावरुन आता डब्लूएचओने इशारा दिला आहे. 

ही वाढ पूर्व भूमध्यसागरीय, आग्नेय आशिया, पश्चिम पॅसिफिकच्या प्रदेशांमध्ये दिसून येत आहे, असं डब्लूएचओचे मत आहे.

'२०२५ च्या सुरुवातीपासून कोरोना व्हेरिएंटच्या ट्रेंडमध्ये थोडा बदल झाला आहे. LP.8.1 व्हेरिएंट कमी होत आहे. NB.1.8.1 ला व्हेरिएंट अंडर मॉनिटरिंगच्या श्रेणीत ठेवण्यात आले असले तरी, त्याची प्रकरणे वेगाने वाढत आहेत. मे २०२५ च्या मध्यापर्यंत, हा व्हेरिएंट जगभरात नोंदवलेल्या एकूण जीनोमिक अनुक्रमांपैकी १०.७% बनला आहे, असं जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे.

सीआरपीएफ जवान निघाला पाकिस्तानचा हेर, NIA ने केली अटक; पाकच्या अधिकाऱ्याला माहिती पुरवणारा तो कोण?

हंगामी पॅटर्न स्पष्ट नाही

WHO च्या मते, सध्याच्या संसर्गाची पातळी गेल्या वर्षीच्या स्थितीला दाखवत आहे.  आतापर्यंत COVID-19 च्या प्रसारात कोणताही स्पष्ट हंगामी पॅटर्न दिसलेला नाही. याशिवाय, अनेक देशांमध्ये देखरेख व्यवस्था अजूनही मर्यादित आहे, जी चिंतेची बाब आहे, असंही WHO ने म्हटले आहे.

WHO ने सर्व सदस्य देशांना जोखीम-आधारित आणि एकात्मिक रणनीतीनुसार कोविडचे व्यवस्थापन करण्याचे आवाहन केले आहे. WHO महासंचालकांच्या शिफारशींचे पालन करा. लसीकरण कार्यक्रम थांबवू नका, तो सुरू ठेवा. उच्च धोका असलेल्या लोकांना लसीकरण करावे. गंभीर आजार आणि मृत्यू रोखण्यासाठी लसीकरण हा सर्वात प्रभावी मार्ग आहे.

Web Title: After a year, 'Covid positivity rate high, NB.1.8.1 variant increased WHO warns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.