शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

२६/११ हल्ला : कारवाई न करणे हा दुबळेपणा; मनीष तिवारी यांच्या पुस्तकातील मत; भाजपची कडाडून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2021 07:35 IST

मनीष तिवारी यांचे ‘१० फ्लॅश पाॅइंट्स, २० इयर्स’ हे पुस्तक लवकरच प्रकाशित हाेणार आहे. त्यात त्यांनी २६/११च्या हल्ल्यावरून मनमाेहनसिंग यांच्या सरकारवर कठाेर शब्दात टीका केली आहे.

नवी दिल्ली : मुंबईवर २६ नाव्हेंबर २००८ राेजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर काेणतीही कारवाई केली नाही. अशा हल्ल्याच्यावेळी संयम दाखवणे ही ताकद नसून दुबळेपणाचे लक्षण आहे, अशा शब्दात काॅंग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी तत्कालीन पंतप्रधान डाॅ. मनमाेहनसिंग यांच्या सरकारवर टीका करून पक्षाला घरचा आहेर दिला.मनीष तिवारी यांचे ‘१० फ्लॅश पाॅइंट्स, २० इयर्स’ हे पुस्तक लवकरच प्रकाशित हाेणार आहे. त्यात त्यांनी २६/११च्या हल्ल्यावरून मनमाेहनसिंग यांच्या सरकारवर कठाेर शब्दात टीका केली आहे. तिवारी यांनी मुंबईवर झालेल्या हल्ल्याची अमेरिकेतील ९/११च्या हल्ल्याशी तुलना केली. भारताने अमेरिकेप्रमाणे प्रत्युत्तर द्यायला हवे हाेते, असे तिवारी यांनी पुस्तकात लिहिले आहे. तिवारी यांनी लिहिले आहे की, शब्दांपेक्षा कृती जास्त बाेलते, अशी कधीतरी वेळ येते. २६/११च्या हल्ल्यानंतर ती वेळ हाेती ज्यावेळी कठाेर कारवाई करायला हवी हाेती. एखाद्या देशाला निर्दाेष नागरिकांची क्रूरपणे हत्या करण्याची खंत वाटत नाही, अशा वेळी संयम हे शक्तीचे नव्हे तर दुबळेपणाचे लक्षण आहे, असे तिवारी यांनी पुस्तकात लिहिले आहे. मुंबईवर झालेल्या २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू झाला हाेता. अजमल कसाबसह दहा दहशतवादी सागरी मार्गाने मुंबईत शिरले हाेते. कसाबला याप्रकरणी फाशी देण्यात आली. इतर सर्व दहशतवाद्यांना हल्ल्यादरम्यान केलेल्या कारवाईत ठार केले हाेते.

सैन्यावर विश्वास नव्हता का? - भाजपचे प्रवक्ते गाैरव भाटिया यांनीही काॅंग्रेसवर टीका करताना सांगितले, की पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी मनमाेहन सिंग यांच्याकडे लष्कर परवानगी मागत हाेते. मात्र, काॅंग्रेसने परवानगी दिली नाही. त्यामागे काय कारण हाेते? आपल्या सैन्यावर तुमचा विश्वास नव्हता का, असा सवाल भाजपने केला आहे.

काँग्रेसची सावध प्रतिक्रिया - तिवारी यांच्या पुस्तकावर काॅंग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, की पुस्तक आधी येऊ द्या. चर्चा करायची की नाही, याबाबत पुस्तक वाचल्यानंतर ठरवू. त्या पुस्तकापेक्षा आज सर्वसामान्य लाेकांसमाेर महागाईचा गंभीर प्रश्न आहे. 

टॅग्स :26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाcongressकाँग्रेसManmohan Singhमनमोहन सिंगBJPभाजपा