Shraddha Murder Case: आफताबची नऊ तास पॉलिग्राफ चाचणी, पोलिसांनी फ्लॅटमधून जप्त केला चाकू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 09:18 IST2022-11-25T09:18:29+5:302022-11-25T09:18:49+5:30
Shraddha Murder Case: श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याच्या पॉलिग्राफ चाचणीचे दुसरे सत्र रोहिणी येथील न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत (एफएसएल) गुरुवारी दुपारी झाले.

Shraddha Murder Case: आफताबची नऊ तास पॉलिग्राफ चाचणी, पोलिसांनी फ्लॅटमधून जप्त केला चाकू
नवी दिल्ली : श्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताब अमीन पूनावाला याच्या पॉलिग्राफ चाचणीचे दुसरे सत्र रोहिणी येथील न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत (एफएसएल) गुरुवारी दुपारी झाले. ताप आणि सर्दीमुळे बुधवारी चाचणी होऊ शकली नव्हती, असे एफएसएलच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
पोलिसांनी आफताबला विचारण्यासाठी ५० प्रश्नांची यादी तयार ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही चाचणी पूर्ण होण्यास उशीर झाल्याने पूनावाला यांची नार्को चाचणीही लांबणीवर पडली आहे. पॉलिग्राफ चाचणीमध्ये रक्तदाब, नाडीचे ठोके आणि श्वसनासारख्या शारीरिक घटनांची नोंद केली जाते आणि ती व्यक्ती खरे बोलत आहे की नाही, हे निर्धारित करण्यासाठी हा डेटा वापरला जातो. दुसरीकडे, नार्को विश्लेषणामध्ये काही औषधांचा समावेश असतो, ज्यामुळे आरोपीचे आत्मभान कमी होते.
श्रद्धा हत्याकांडाला लव्ह जिहाद म्हटल्याने ओवेसी संतप्त
nश्रद्धा वालकर हत्यांकाडाला लव्ह जिहाद संबोधण्यात येत असल्याबद्दल एएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
nदेशातील महिलांवरील गुन्हेगारीचे कारण पुरुषांची आजारी मानसिकता आहे, असे ओवेसी म्हणाले.