संपूर्ण मेघालय आणि अरुणाचलच्या काही भागातून AFSPA हटवला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 19:01 IST2018-04-23T19:01:08+5:302018-04-23T19:01:08+5:30
केंद्रीय गृहमंत्रालयाने सोमवारी मोठा निर्णय घेताना संपूर्ण मेघालय आणि अरुणाचल प्रदेशच्या काही भागामधून वादग्रस्त अफस्फा कायदा हटवण्याचा निर्णय घेतला.

संपूर्ण मेघालय आणि अरुणाचलच्या काही भागातून AFSPA हटवला
नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्रालयाने सोमवारी मोठा निर्णय घेताना संपूर्ण मेघालय आणि अरुणाचल प्रदेशच्या काही भागामधून वादग्रस्त अफस्फा कायदा हटवण्याचा निर्णय घेतला. 2017 सालच्या सप्टेंबर महिन्यापर्यंत मेघालयच्या 40 टक्के भागात अफस्फा लागू होता. राज्य सरकारसोबत गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या चर्चेनंतर मेघालयमधून अफस्फा पूर्णपणे मागे घेण्याचा निर्णय झाल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले आहे.
त्याबरोबरच अरुणाचल प्रदेशमधील बहुतांश भागांमधूनही अफस्फा हटवण्यात आला आहे. आता अरुणाचल प्रदेशमध्ये केवळ 8 पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अफस्फा लागू आहे.