शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Afghanistan Taliban: 350 तालिबानी ठार मारल्याचा नॉर्दर्न अलायन्सने केला दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 07:09 IST

कारवाईत अनेक अमेरिकन वाहने, शस्त्रे हाती लागली आहेत. या आधी मंगळवारी रात्रीदेखील तालिबानने पंजशीरमध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आली होती.

नवी दिल्ली : तालिबान एकीकडे जगासमोर शांततेत अफगाणिस्तानमध्ये सरकार बनवून ते चालवत असल्याचा दावा करीत आहे तर दुसरीकडे तालिबानी पंजशीर भागात घुसखोरीचा प्रयत्न करीत आहेत. ट्विटरवर नॉर्दर्न अलायन्सने मंगळवारी रात्री खावकमध्ये हल्ला करण्यासाठी आलेल्या ३५० तालिबानींना ठार मारून ४० पेक्षा जास्त जणांना ताब्यात घेण्यात आले, असा दावा केला आहे. 

या कारवाईत अनेक अमेरिकन वाहने, शस्त्रे हाती लागली आहेत. या आधी मंगळवारी रात्रीदेखील तालिबानने पंजशीरमध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आली होती. तेथे त्यांचा संघर्ष नॉर्दर्न अलायन्सच्या लढवय्यांशी झाला.  स्थानिक पत्रकार नातिक मालिकज़ादाने केलेल्या ट्वीटनुसार अफगाणिस्तानच्या पंजशीरच्या प्रवेशद्वारावर गुलबहार भागात तालिबानी आणि नॉर्दर्न अलायन्सचे लढवय्ये यांच्यात संघर्ष झाला. 

एवढेच नाही तर तालिबानने येथे एक पूल उडवून दिल्याचेही वृत्त  आहे. याशिवाय अनेक  तालिबानींंना पकडल्याचे सांगितले जात आहे. सोमवारी रात्री तालिबान आणि नॉर्दर्न अलायन्सच्या लढवय्यांत गोळीबार झाला व त्यात  ७-८ तालिबानी मारले गेल्याचे वृत्त आहे.

सैन्य मागे घेणे हा चांगला पर्याय होता -बायडेन

अमेरिकेच्या सर्वात दीर्घकाळ सुरू असलेल्या युद्धाला आणि लष्करी बळाने इतर देशांची पुनर्निर्मिती करण्याच्या दशकांपासून सुरू असलेल्या निरर्थक प्रयत्नांना पूर्णविराम देण्याचा एक चांगला पर्याय होता, अशा शब्दात अध्यक्ष जो बायडेन यांनी अफगाणिस्तानातून सैन्य मागे घेण्याच्या निर्णयाचे समर्थन केले. सैन्य मागे घेण्याच्या निर्णयावरून बायडेन सध्या जोरदार टीकेला तोंड देत आहेत. 

अफगाणिस्तानातून बाहेर पडताना झालेल्या गोंधळाचे बायडेन यांनी व्यूहरचनेच्यादृष्टीने यश असल्याचे म्हटले. ते म्हणाले की,“काही आठवड्यांपूर्वी जरी ते काम सुरू केले असते तरी असाच गोंधळ झाला असता. अफगाणिस्तानात राहत असताना आणखी अमेरिकन तुकड्यांची गरज पडलीच असती.”

जीवितहानीशिवाय अमेरिकेने काही मिळवले नाही - पुतीन

अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेने लष्करी हस्तक्षेप करून दोन्ही बाजूची जीवितहानी आणि शोकांतिकेशिवाय काही मिळवले नाही आणि इतर देशांवर विदेशी मूल्ये लादणे अशक्य असते हे दाखवून दिले, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी म्हटले.“अमेरिकेची लष्करी दले अफगाणिस्तानात २० वर्षे राहिली आणि २० वर्षे त्यांनी तेथे राहणाऱ्या लोकांवर आपली जीवन जगण्याची पद्धत बिंबविण्याचा प्रयत्न केला. या सगळ्याचा एकच परिणाम झाला तो म्हणजे अमेरिकेची आणि तेथे राहणाऱ्या लोकांची जीवितहानी. दरम्यान, इंग्लंडच्या सरकारने अफगाणिस्तानात असलेले ब्रिटिश नागरिक आणि पात्र अफगाण निर्वासित यांना सुरक्षितरीत्या बाहेर आणता यावे यासाठी तालिबानशी चर्चा सुरू केली आहे, असे बुधवारी डाऊनिंग स्ट्रीटने म्हटले.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानIndiaभारतAmericaअमेरिकाrussiaरशिया