शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मास्क न लावल्याने झाली 500 रुपयांची शिक्षा, वकिलानं मागितली 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: September 20, 2020 14:31 IST

राजधानी दिल्लीत पोलिसांनी एका व्यक्तीला कारमध्ये मास्क न लावल्याने 500 रुपयांची शिक्षा केली. यावर त्या व्यक्तीने आता 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे. 

ठळक मुद्देराजधानी दिल्लीत पोलिसांनी एका व्यक्तीला कारमध्ये मास्क न लावल्याने 500 रुपयांची शिक्षा केली.त्या व्यक्तीने आता 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे. दिल्लीतील सौरभ शर्मा हे पेशाने वकील आहेत. ते 9 सप्टेंबरला आपल्या कारने एकटेच जात होते.

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसने संपूर्ण देशात थैमान घातले आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी मास्कचा वापर करणे आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे अत्यंत आवश्यक आहे. एवढेच नाही, तर मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईही केली जात आहे. मात्र, राजधानी दिल्लीतपोलिसांनी एका व्यक्तीला कारमध्ये मास्क न लावल्याने 500 रुपयांची शिक्षा केली. यावर त्या व्यक्तीने आता 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे. 

संबंधित व्यक्ती राजधानी दिल्लीत कारने प्रवास करत होती. महत्वाचे म्हणजे ती व्यक्ती कारमध्ये एकटीच होती. मात्र  मास्क न लावल्याने पोलीसाने तिला रोखले आणि 500 रुपयांची शिक्षा केली. यानंतर संबंधित व्यक्तीने यासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल केली असून केवळ शिक्षेची रक्कमच परत मागितली नाही, तर नुकसानभरपाई म्हणून 10 लाख रुपये मागितले आहेत. 

माध्यमांतील वृत्तानुसार, दिल्लीतील सौरभ शर्मा हे पेशाने वकील आहेत. ते 9 सप्टेंबरला आपल्या कारने एकटेच जात होते. त्यांनी मास्क लावलेले नव्हते. याच वेळी येथील गीता कॉलनीजवळ पोलिसाने त्यांना अडवले आणि 500 रुपयांची शिक्षा केली. यावेळी सोरभ पोलिसाला म्हणाले, कारमध्ये एकट्याने प्रवास करताना मास्कची आवश्यकता नाही. मात्र, पोलिसांनी त्यांचे ऐकले नाही आणि त्यांच्याकडून दंड वसूल केला.

यानंतर आता, सौरभ यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यात त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांकडून केवळ शिक्षेची रक्कमच नाही, तर 'मानसिक छळ' केल्याचा आरोप करत नुकसानभरपाई म्हणून दहा लाख रुपये मागितले आहेत. ‘कार त्यांचे खासगी क्षेत्र आहे आणि त्यामुळे एकट्याने प्रवास करताना मास्क लावण्याची तुलना, सार्वजनिक ठिकाणी मास्क लावण्याशी केली जाऊ शकत नाही,’ असे सौरभ यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

डोनाल्ड ट्रम्प यांना मारण्याचा प्रयत्न! व्हाईट हाऊसमध्ये पोहोचण्यापूर्वीच पकडलं विषाचं पाकीट

केंद्र सरकारच्या 3 योजना, केवळ 400 रुपयांत सुरक्षित होईल भविष्य

भारत-चीन वादात रशियाची एन्ट्री, मोठा आहे पुतीन यांचा आशिया खंडातला प्लॅन 

"झोपेत घोरत असाल तर सावधान! कोरोनामुळे मृत्यूचा तिप्पट धोका"

मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसcarकारadvocateवकिलdelhiदिल्लीPoliceपोलिस