शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
3
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
4
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
5
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
6
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
7
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
8
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
9
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
10
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
11
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
12
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
13
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
14
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
15
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
16
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
17
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
18
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
19
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
20
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान

अडवाणींसह इतर भाजप नेते मनमोहन सिंग यांच्यासमोर फायली फेकायचे; जयराम रमेश यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 15:32 IST

Manmohan Singh: काँग्रेस नेते जयराम रमेश, यांच्या दाव्याने नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

Jairam Ramesh On Dr. Manmohan singh: भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी(26 डिसेंबर 2024) दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाले. तर, शनिवारी (28 डिसेंबर 2024) त्यांच्यावर दिल्लीतील निगमबोध घाटावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारानंतर मनमोहन सिंग यांच्या समाधी स्थळावरुन नवा राजकीय वाद पेटला आहे. भाजपने मनमोहन सिंग यांचा अपमान केल्याचा आरोप काँग्रेस करत आहे. अशातच, आता काँग्रेस सचिव जयराम रमेश यांनी एक धक्कादायक दावा केला होता. 

काय आहे जयराम रमेश यांचा दावा?एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत जयराम रमेश यांनी अशा गोष्टी सांगितल्या, ज्यामुळे नवा वाद निर्माण होऊ शकतो. "2004 मध्ये मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान झाले, त्यावेळी भाजप नेते त्यांच्याशी नीट बोलले नव्हते. मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान होतील, अशी भाजप नेत्यांना अपेक्षा नव्हती. लालकृष्ण अडवाणींसह भाजपचे इतर नेते पंतप्रधान मनमोहन सिंग यांना भेटायला यायचे, तेव्हा त्यांच्यासमोर फायली फेकायचे. तरीदेखी, मनमोहन सिंग यांनी नेहमीच या नेत्यांशी अत्यंत विनम्रपणे चर्चा केली," असा दावा त्यांनी केला आहे.

व्हिडिओ पाहा:-

जयराम रमेश पुढे म्हणाले, "सत्ताधारी आज डॉ. मनमोहन सिंग यांची स्तुती करत आहेत, गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्या योगदानाचे स्मरण करत आहेत, त्यांनी आधी मनमोहन सिंग यांचे व्यक्तिमत्त्व पहावे. त्यांच्या नोटाबंदीवरील भाषणाने सरकार हादरले होते. लाला बहादूर शास्त्री यांच्याबद्दल सांगितले जाते की, ते अजातशत्रू होते. मी डॉ. मनमोहन सिंग यांचे वर्णनदेखील तसेच करेन," असंही जयराम रमेश म्हणाले.

काँग्रेसने काय आरोप केला?"मनमोहनसिंग 10 वर्षे पंतप्रधान होते. त्यांनी आखलेल्या धोरणांमुळे आजही गरीब व मागासवर्गीयांना मोठे बळ मिळते. आजवर सर्व माजी पंतप्रधानांचे अंतिम संस्कार विशिष्ट स्थळी करण्यात आले. मात्र मनमोहनसिंग यांच्या अंत्यसंस्कारांच्या वेळी भाजपप्रणीत सरकारने वेगळी भूमिका घेतली. स्मारक बांधता येईल अशी जागा न निवडता निगमबोध घाटावर माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय भाजपप्रणीत केंद्र सरकारने घेतला. या सरकारने देशाच्या थोर सुपुत्राचा व पहिल्या शीख पंतप्रधानांचा घोर अपमान केला," असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे माजी पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी केला. 

लँडिंगवेळी विमानाला पक्षांच्या थव्याची धडक; दक्षिण कोरियातील अपघाताचे कारण आले समोर

टॅग्स :Manmohan Singhडॉ. मनमोहन सिंगLal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणीBJPभाजपाcongressकाँग्रेस