शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे प्रवाशांचा पत्ता तिकीट आरक्षणात हवाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 02:50 IST

आयआरसीटीसीचे मोबाइल अ‍ॅप, आॅनलाइन किंवा काऊंटर अशा तीनपैकी कुठेही आरक्षण केले तरी ही माहिती द्यावी लागणार आहे.

नवी दिल्ली : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर रुग्णाची ओळख लगेचच पटावी याकरिता याकरिता रेल्वे तिकीट आरक्षणाच्या फॉर्ममध्ये आता अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. आता प्रवाशाला तो कोणत्या रेल्वे स्थानकापर्यंत जाणार आहे इतकाच तपशील न लिहिता तो ज्या ठिकाणी जाणार आहे तिथला सविस्तर पत्ता फॉर्मवर लिहावा लागणार आहे. आयआरसीटीसीचे मोबाइल अ‍ॅप, आॅनलाइन किंवा काऊंटर अशा तीनपैकी कुठेही आरक्षण केले तरी ही माहिती द्यावी लागणार आहे.रेल्वे खात्याने यासंदर्भात म्हटले आहे की, रेल्वे प्रवाशांना आरक्षण फॉर्ममध्ये आता अधिक तपशीलवार माहिती द्यावी लागेल. प्रवाशाने पूर्वी आपल्याला जायचे असलेले ठिकाण किंवा त्या जिल्ह्याचे नाव लिहिले तरी काम भागत असे. पण आता प्रवाशाला त्याचा मोबाइल किंवा लँडलाइन फोन नंबर, जिथे जायचे आहे तिथला सविस्तर पत्ता, त्या जिल्ह्याचा पिनकोड क्रमांक, राज्याचे नाव, आपले ओळखपत्र क्रमांक अशी सारी माहिती तिकीट आरक्षण फॉर्ममध्ये लिहावी लागणार आहे. प्रवासात सोबत असणाऱ्या मोबाइल फोनचाच क्रमांक तिकीट आरक्षण फॉर्ममध्ये लिहिणे व मोबाइल फोनमध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करणे अनिवार्य करण्यात आले आहे. आपल्या प्रवासाचा हेतू काय हेही या फॉर्ममध्ये लिहायचे आहे. जर प्रवाशाने माहिती नीट दिली नाही तर त्याला तिकीट देण्यात येणार नाही असे रेल्वेने म्हटले आहे.>सहप्रवासी कोण हेही कळणाररेल्वे प्रवासात एखादा कोरोनाचा रुग्ण आढळून आला तर त्याने कुठे कुठे प्रवास केला आहे व त्याच्या सोबत कोणी प्रवास केला याची खात्रीलायक माहिती मिळावी म्हणून तिकीट आरक्षण फॉर्ममध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे तो प्रवासी व त्याच्या संपर्कात आलेले लोक यांच्यावर त्वरित उपचार करणे शक्य होईल. त्याद्वारे कोरोना संसर्गाची साखळी तोडता येणार आहे.