लोकमत आपल्या दारी जोड... ३
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:09+5:302015-02-14T23:52:09+5:30
गार्डन स्वच्छ करावे...

लोकमत आपल्या दारी जोड... ३
ग र्डन स्वच्छ करावे...सार्वजनिक कचरा टाकला जात असल्याने गार्डनमध्ये नुसती घाण पसरली आहे. त्यामुळे कॉलनीतील महिलांना हळदी-कुंकवासह कोणताच सार्वजनिक कार्यक्रम घेता येत नाही. सिडकोने गार्डनची साफसफाई करून लहान मुले व नागरिकांसाठी गार्डन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी रंजना रोकडे यांची आहे. कचराकुंडीचा त्रास....घराशेजारीच क चराकुंडी आहे. नागरिक येथेच कचरा टाकतात. वेळेवर कचरा उचलला जात नसल्याने दुर्गंधी पसरते. शिवाय कचरा हवेमुळे घरात येतो. घरासमोरील लाईटही बंद आहे. कचर्यामुळे कुत्रे सारखे फिरतात. कचराकुंडीमुळे खूप त्रास सहन करावा लागत असल्याचे कविता हंडोरे यांचे म्हणणे आहे. नाल्याची सफाई होत नाही...नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा व सांडपाणी साचल्याने घाणीचे साम्राज्य पसरले आहे. नाल्याची कोणीच सफाई करीत नाही. नागरिकांना दुर्गंधी व डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. दुर्गंधी व डासांमुळे नागरिक परेशान आहेत, असे प्रतिभा मलिक यांनी सांगितले. चोरांची भीती...पथदिवे व पोलीस चौकीही बंद आहे. त्यामुळे या भागात सारख्या चोर्या होत आहेत. अंधाराचा फायदा घेऊन चोरटे पसार होतात. वाढत्या चोर्यांमुळे नागरिकांमध्ये भीती पसरली आहे, असे मंदा राजपूत यांचे म्हणणे आहे. कचरा वेळेवर उचलावा...नागरिकांच्या घराशेजारीच कचराकुं ड्या ठेवल्याने संपूर्ण कचरा येथेच टाकला जात असून, कंुडीला कचरा डेपोचे स्वरूप आले आहे. सफाई कामगार वेळेवर कचरा उचलत नाहीत. कचरा जागेवरच सडून परिसरात दुर्गंधी पसरत आहे. प्रशासनाने कचरा वेळेत उचलावा. जेणेकरून नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही, असे लक्ष्मी कराळे यांचे म्हणणे आहे. (जोड आहे)