वाळूज लोकमत दारी जोड.. १

By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:06+5:302015-02-14T23:52:06+5:30

ग्रोथ सेंटर भागात महावितरण कार्यालयासमोरील वसाहतीला पुरेसे पाणी मिळत नाही. अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आलेले नाही. उद्याने भकास झाली आहेत. सिडकोच्या मोकळ्या जागेवर वाळूचे ढीग पडलेले आहेत. उद्यान असूनही त्याचा उपयोग नागरिक व त्यांच्या मुलांसाठी केला जात नाही. अनेक ठिकाणी नाल्यावर ढापे नाहीत. विशेष म्हणजे सिडको कार्यालयासमोरील भागातच नाली उघडी आहे. तसेच विद्युत डीपीही उघड्या आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. कचराकुंड्यांची व्यवस्था नाही. सेवाकराची बिले वेळेवर मिळत नसल्यामुळे नागरिकांना अतिरिक्त पैसे भरावे लागत आहेत. अशा एक ना अनेक समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत; परंतु याकडे सिडको प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. अनेक वेळा मागणी करूनही सिडको प्रशासनाकडून सुविधा पुरविल्या जात नाहीत, असे या भागातील नागरिकांचे

Add salt to the masses .. 1 | वाळूज लोकमत दारी जोड.. १

वाळूज लोकमत दारी जोड.. १

रोथ सेंटर भागात महावितरण कार्यालयासमोरील वसाहतीला पुरेसे पाणी मिळत नाही. अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आलेले नाही. उद्याने भकास झाली आहेत. सिडकोच्या मोकळ्या जागेवर वाळूचे ढीग पडलेले आहेत. उद्यान असूनही त्याचा उपयोग नागरिक व त्यांच्या मुलांसाठी केला जात नाही. अनेक ठिकाणी नाल्यावर ढापे नाहीत. विशेष म्हणजे सिडको कार्यालयासमोरील भागातच नाली उघडी आहे. तसेच विद्युत डीपीही उघड्या आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. कचराकुंड्यांची व्यवस्था नाही. सेवाकराची बिले वेळेवर मिळत नसल्यामुळे नागरिकांना अतिरिक्त पैसे भरावे लागत आहेत. अशा एक ना अनेक समस्यांनी नागरिक त्रस्त झाले आहेत; परंतु याकडे सिडको प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. अनेक वेळा मागणी करूनही सिडको प्रशासनाकडून सुविधा पुरविल्या जात नाहीत, असे या भागातील नागरिकांचे म्हणणे आहे. एकूणच सिडको प्रशासनाकडून सक्तीने कराची वसुली करूनही मूलभूत सुविधा मिळत नसल्यामुळे अनेक अडचणीला तोंड द्यावे लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
यासंदर्भात सिडकोचे वाळूज महानगरचे प्रशासक पंजाबराव चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
फोटो ओळ -
देवगिरीनगरातील सांडपाणी वाहून नेणार्‍या नाल्याची सफाई होत नसल्याने नाल्यात कचरा व सांडपाणी साचल्याने दुर्गंधी पसरली आहे.
फोटो क्रमांक - १४ फेब्रुवारी सिडको नाला.
फोटो ओळ -
देवगिरीनगरातील मैदानातच कचराकुंड्या ठेवल्या असून येथेच कचरा टाकला जात आहे. त्यामुळे मैदानावर सर्वत्र घाण साचली आहे.
फोटो क्रमांक - १४ फेब्रुवारी सिडको ग्राऊंड
फोटो ओळ -
सिडको वाळूज महानगरातील पोलीस चौकी बंद असल्यामुळे नागरिकांना चोरी व टवाळखोर तरुण मुलांचा त्रास सहन करावा लागतो.
फोटो क्रमांक - १४ फेब्रुवारी पोलीस स्टेशन
फोटो ओळ -
ग्रोथ सेंटर भागातील मागील काही महिन्यांपासून गार्डन बंद असल्यामुळे लहान मुलांचा हिरमोड होत आहे. गार्डनला असा टाळा टोकला आहे.
फोटो क्रमांक - १४ फेब्रुवारी गार्डन
(सर्व छायाचित्रे - आतिश वानखेडे)

Web Title: Add salt to the masses .. 1

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.