आबा जोड
By Admin | Updated: February 16, 2015 21:12 IST2015-02-16T21:12:09+5:302015-02-16T21:12:09+5:30
मित्र आणि मार्गदर्शक हरपला - सुनील केदार

आबा जोड
म त्र आणि मार्गदर्शक हरपला - सुनील केदारआर. आर. पाटील ऊर्फ आबा हे माझे जवळचे मित्र, माझे मार्गदर्शक. त्यांच्या अचानक जाण्याने माझे व्यक्तिश: नुकसान झाले. मी मार्गदर्शकाला मुकलो. सामान्य माणसांचे दु:ख जाणून घेणारा नेता आपल्यातून निघून गेला.- सुनील केदार, आमदार, सावनेर.....कुशल नेतृत्व - बंडोपंत उमरकरराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या निधनाने राज्याची हानी झाली आहे. राज्याच्या विकासात त्यांचे मोठे योगदान असून राज्याचे नुकसान झाले. एका कुशल नेतृत्वाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गमावले. - बंडोपंत उमरकर, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, नागपूर (ग्रामीण).