विश्लेषण जोड
By Admin | Updated: September 1, 2015 21:38 IST2015-09-01T21:38:20+5:302015-09-01T21:38:20+5:30
विरोधकांना काय बोलायचे ते बोलू द्या, प्रत्येकाला महासभेत मत प्रदर्शन करण्याचा अधिकार आहे. मात्र विरोधकांचा आवाज दाबून विषय मंजूर करण्याचा चुकीचा पायंडा तोही आमदारांच्या साक्षीने महापालिकेच्या सभेत पडतोय हे नगरकरांना रुचेल काय याचे सर्वेक्षण संग्राम जगताप यांनी एकदा करावेच, म्हणजे समजेल. ज्या सभागृहात नगर शहर विकासाचे धोरण ठरवायचे असते ते ठरविताना सभागृहात ज्येष्ठाचे अनुभव विचारात घेतले तर ते अधिक सुबक पध्दतीने उतरेल हे न कळण्याइतपत जगताप-कळमकर दूधखुळे नक्कीच नाहीत. नव्या दमाच्या नगरसेवकांना अजून नगरसेवक निधी खर्ची कसा टाकावा याचेही ज्ञान नाही. त्यांनी जणू काही निम्मी हयात पालिकेच्या राजकारणात गेली अशा अविर्भावात बोलणे योग्य की अयोग्य हे त्यांनीच ठरवावे. सत्ताधारी पक्षातील तरुणांना नगर शहर विकासाची चाड असेल तर यापुढे असे घडणार नाही

विश्लेषण जोड
व रोधकांना काय बोलायचे ते बोलू द्या, प्रत्येकाला महासभेत मत प्रदर्शन करण्याचा अधिकार आहे. मात्र विरोधकांचा आवाज दाबून विषय मंजूर करण्याचा चुकीचा पायंडा तोही आमदारांच्या साक्षीने महापालिकेच्या सभेत पडतोय हे नगरकरांना रुचेल काय याचे सर्वेक्षण संग्राम जगताप यांनी एकदा करावेच, म्हणजे समजेल. ज्या सभागृहात नगर शहर विकासाचे धोरण ठरवायचे असते ते ठरविताना सभागृहात ज्येष्ठाचे अनुभव विचारात घेतले तर ते अधिक सुबक पध्दतीने उतरेल हे न कळण्याइतपत जगताप-कळमकर दूधखुळे नक्कीच नाहीत. नव्या दमाच्या नगरसेवकांना अजून नगरसेवक निधी खर्ची कसा टाकावा याचेही ज्ञान नाही. त्यांनी जणू काही निम्मी हयात पालिकेच्या राजकारणात गेली अशा अविर्भावात बोलणे योग्य की अयोग्य हे त्यांनीच ठरवावे. सत्ताधारी पक्षातील तरुणांना नगर शहर विकासाची चाड असेल तर यापुढे असे घडणार नाही याची दक्षता घेतली तरी पुरे, नाहीतर हे असे गुंडागर्दीची भाषा करणारे अन् त्याला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पाठबळ देणारे काय शहर विकासाचे धोरण आखणार? असा प्रश्न प्रत्येक नगरकरांच्या मनात नक्कीच निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आमदार संग्राम जगताप हे आता विधीमंडळ सदस्य आहेत. तेथील नियम त्यांनी जाणून घेतले असतीलच. तेथे जसे राज्याचे धोरण ठरते तसेच येथे शहराचे धोरण ठरते हेही ते विसरले काय? शहर विकासाच्या मुद्यावर नगरकरांनी तुम्हाला विधानसभेत पाठविले. त्यांच्या अपेक्षा सार्थ ठरवू असे जाहीर आश्वासन जगताप अजूनही देतात. दहा वर्षापूर्वीचा जगताप कुटुंबाचा काळ आठवला तर त्यांच्यासोबतही नाही अन् विरोधाताही नाही असा कल नगरकरांचा असायचा. मध्यंतरीच्या काळात संग्राम जगताप यांनीच निर्माण झालेली ती प्रतिमा बदलविली. त्याचे फळ त्यांना मिळाले. पण आता भोवताली जमा झालेल्या कोंडाळ्यात राहून संग्राम जगताप पुन्हा त्या प्रतिमेकडे झुकत असल्याचे शल्य नगरकरांच्या जिव्हारी लागेल याचे भान संग्राम जगताप यांनी ठेवले तरी पुरे!