शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेत्री ममता कुलकर्णीची 'किन्नर आखाड्यातून' हकालपट्टी; शंकराचार्यांवरच्या टीकेनंतर खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2026 18:50 IST

Mamta Kulkarni expelled Kinnar Akhara शंकराचार्यांना खोटे म्हणणं ममता कुलकर्णीला नडलं. किन्नर आखाड्याने तिला बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

प्रयागराज महाकुंभमधील सर्वात मोठा धार्मिक वाद अखेर टोकाला पोहोचला आहे. ज्योतिषपीठाचे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्यावर टीका करणाऱ्या अभिनेत्री ममता कुलकर्णी (यामाई ममता नंद गिरी) हिची 'किन्नर आखाड्या'तून हकालपट्टी करण्यात आली आहे. आखाड्याच्या प्रमुख आचार्य महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे या निर्णयाची अधिकृत पुष्टी केली.

त्रिपाठी म्हणाल्या की, "आखाड्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आम्ही हा निर्णय घेतला आहे. आता ममता कुलकर्णीशी आखाड्याचा कोणताही संबंध नाही. ती आता आखाड्याची अधिकारी किंवा सदस्य नाही. आमच्या आखाड्यात महिला, पुरुष आणि किन्नर सर्व आहेत. आम्हाला कोणताही वाद नको आहे. तसेच मौनी अमावस्येच्या दिवशी ज्या प्रकारे बटुक ब्राह्मणांना शिखा धरून मारहाण झाली, त्याबद्दलही आमची तीव्र नाराजी आहे."

ममता कुलकर्णीचा 'तो' वादग्रस्त दावा२५ जानेवारी रोजी ममता कुलकर्णीने शंकराचार्य वादावर बोलताना खळबळजनक विधान केले होते. ती म्हणाली होती की, "१० पैकी ९ महामंडलेश्वर आणि तथाकथित शंकराचार्य खोटे आहेत आणि त्यांना शून्य ज्ञान आहे." याशिवाय तिने शंकराचार्यांना दोन रोखठोक प्रश्न विचारले होते. यामध्ये त्यांची शंकराचार्य पदी नियुक्ती कोणी केली? व कोट्यवधींच्या गर्दीत पालखी घेऊन निघण्याची काय गरज होती? यावरून ही कारवाई झाली आहे.

"मी हकालपट्टी नाही, तर राजीनामा दिलाय" आखाड्यातून काढल्याच्या वृत्तावर ममता कुलकर्णीने वेगळाच दावा केला आहे. ती म्हणाली, "मी महामंडलेश्वर पदाचा राजीनामा दिला आहे. खरं तर महामंडलेश्वर पद हे अनेक वर्षांच्या आध्यात्मिक तपस्येतून मिळतं. मी पाहिलंय की, खरा महंत किंवा महामंडलेश्वर होण्यासाठी अनेक वर्ष ध्यान आणि शिस्तीतून जावं लागतं."

English
हिंदी सारांश
Web Title : Mamta Kulkarni Expelled from Kinnar Akhada After Criticism of Shankaracharya

Web Summary : Actress Mamta Kulkarni was expelled from Kinnar Akhada for criticizing Shankaracharya. The Akhada cited her controversial statements and disregard for monastic traditions as reasons for her removal, despite her claims of resignation.
टॅग्स :Mamta Kulkarniममता कुलकर्णी