शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
2
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
3
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
4
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
5
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
6
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
7
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
8
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
9
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
10
आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
11
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
12
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
13
Astro Tips: मनासारखा जोडीदार नशिबात आहे की नाही हे कसे ओळखावे? ज्योतिष शास्त्रानुसार... 
14
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
15
"विवाहित मुलांना वडिलांच्या मालमत्तेत राहण्याचा कोणताही अधिकार नाही"; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
16
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
17
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
18
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
19
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
20
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
Daily Top 2Weekly Top 5

'माझ्यासोबत काहीही करा पण सत्य...'; ४१ जणांचा बळी गेल्यानंतर थलापती विजयची पहिली प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 17:31 IST

Thalapathy Vijay karur Stempede : तमिळनाडूत चेंगराचेंगरीनंतर ४१ जणांचा मृत्यू झाल्यावर अभिनेता विजयने प्रतिक्रिया दिली आहे.

Actor Vijay on Tamil Nadu Stampede: तमिलगा वेट्टी कझगम प्रमुख आणि अभिनेता थलापती विजय याच्या निवडणूक रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीत ४१ जणांचा मृत्यू झाला आणि ६० जण जखमी झाले. विजय पक्षाच्या प्रचारासाठी तामिळनाडूतील करूर येथे आला होता. यावेळी अभिनेत्याला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. याच गर्दीत चेंगराचेंगरी झाली आणि अनेकजण मृत्यूमुखी पडले. दुसरी राज्य आणि केंद्र सरकारने या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. अशातच अभिनेता विजयने पहिल्यांदाच या भयानक घटनेवर भाष्य केलं. मी कधीही अशी दुःखद घटना पाहिली नव्हती असं विजयने म्हटलं.

२७ सप्टेंबर रोजी टीव्हीके प्रमुख आणि तमिळ स्टार अभिनेता विजय याच्या उपस्थितीत करूर येथे झालेल्या रॅलीत चेंगराचेंगरी झाली. ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी सुरू असताना, विजय यांने एक व्हिडीओ मेसेज जारी केला आहे. विजय अद्याप चेंगराचेंगरीतील पीडितांना भेटलेलो नाही, कारण परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती आहे. त्यामुळे त्याने व्हिडीओ मेसेजद्वारे या घटनेवर भाष्य केलं. माझ्यावर कारवाई करा पण कार्यकर्त्यांना सोडून द्या असं विजयने सरकारला म्हटलं आहे.

"माझ्या आयुष्यात मी कधीही अशा वेदनादायक आणि भयानक परिस्थितीचा सामना केला नाही. मला खूप वेदना होत आहेत. राजकारण बाजूला ठेवून, आम्ही नेहमीच पोलिसांकडून सुरक्षित जागेसाठी परवानगी मागतो. पण ज्या गोष्टी घडायला नको होत्या त्या घडल्या आहेत. मी लवकरच पीडितांना भेटेन. या नुकसानीमुळे दुःखात असलेल्या कुटुंबाप्रती मी मनापासून सहानुभूती व्यक्त करतो. माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे मुख्यमंत्री महोदय, मी तुम्हाला विनंती करतो - कृपया माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना इजा पोहोचवू नका. तुम्ही माझ्या घरी किंवा माझ्या कार्यालयात येऊन माझ्याविरुद्ध कोणतीही कारवाई करू शकता, पण त्यांच्याविरुद्ध नाही. लवकरच सत्य बाहेर येईल," असं विजयने म्हटलं.

दरम्यान, टीव्हीकेने करूर येथे आयोजित केलेल्या रॅलीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीप्रकरणी अटक केलेल्या पक्षाच्या दोन पदाधिकाऱ्यांना मंगळवारी न्यायालयाने रिमांडवर पाठवले. टीव्हीकेचे करूर पश्चिम जिल्हा सचिव व्ही.पी. मथिलागन आणि करूर मध्य जिल्हा सचिव कासी पौनराज यांचे नाव एफआयआरमध्ये आहे आणि त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे, टीव्हीकेचे राज्य सरचिटणीस बस्सी आनंद आणि उपसरचिटणीस निर्मल कुमार यांचेही नाव एफआयआरमध्ये आहे, पण त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Do anything to me, but truth: Vijay on tragedy

Web Summary : Actor Vijay reacted to the Tamil Nadu stampede that killed 41. He expressed grief, offered condolences, and pleaded for his party workers' release, ready to face action himself. He promised to visit victims soon.
टॅग्स :TamilnaduतामिळनाडूStampedeचेंगराचेंगरीAccidentअपघात