शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
6
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
7
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
8
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
9
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
10
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
11
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
12
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
13
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
14
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
15
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
16
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
17
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
18
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
19
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
20
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका

हे राम! अभिनेते प्रकाश राज यांनी चाइल्ड पॉर्नशी केली रामलीलेची तुलना   

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 6:18 PM

दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी रामलीलेसंदर्भात केलेल्या एका वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले आहे.

ठळक मुद्देरामलीलेसारखे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम या देशात आयोजित होता कामा नयेत, रामलीला ही चाइल्ड पॉर्नसारखी आहेरामलीलेसारखे कार्यक्रम समाजाचे नुकसान करतात. त्या माध्यमातून अल्पसंख्याकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होत आहेसंस्कृती काय आहे आणि काय नाही हे मी चांगले जाणतो. पण राम, लक्ष्मण आणि सीतेला हेलिकॉप्टरमधून आणणे आणि खाली उतरवणे ही माझी संस्कृती नाही

नवी दिल्ली - दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज यांनी रामलीलेसंदर्भात केलेल्या एका वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले आहे. प्रकाश राज यांचा भारताच्या संस्कृतीवर भाष्य करणारा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे, या व्हिडीओमधून ते रामलीलेची तुलना चाइल्ड पॉर्नशी करताना दिसत आहेत. दरम्यान, हा व्हिडीओ 2018 मधील असून, योगी आदित्यनाथ यांच्याकडून रामलीलेच्या होत असलेल्या प्रचार प्रसारावर टीका करताना त्यांनी हे वक्तव्य केल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून प्रकाश राज यांच्यावर सोशल मीडियामधून जोरदार टीका होत आहे.  प्रकाश राज म्हणतात, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे रथोत्सवात सहभागी होणे थोडे विचित्रच वाटते. मुख्यमंत्री म्हणून हे योग्य वाटते का? मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे धार्मिक उत्सवात सहभागी होणे हा केवळ एक दिखावा आहे. खरंतर या माध्यमातून अल्पसंख्याकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरवणे हा खरा हेतू आहे.   ''रामलीलेसारखे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम या देशात आयोजित होता कामा नयेत, रामलीला ही चाइल्ड पॉर्नसारखी आहे, असेही प्रकाश राज यावेळी म्हणाले. ''मुलांनी चाइल्ड पॉर्न पाहिल्यास तुम्ही त्याला विचारणार नाही का? तुम्ही त्यांना तसेच सोडणार का? रामलीला ही समाजासाठी चांगली नाही. रामलीलेसारखे कार्यक्रम समाजाचे नुकसान करतात. त्या माध्यमातून अल्पसंख्याकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण होत आहे, असेही त्यांनी सांगितले. संस्कृती काय आहे आणि काय नाही हे मी चांगले जाणतो. पण राम, लक्ष्मण आणि सीतेला हेलिकॉप्टरमधून आणणे आणि खाली उतरवणे ही माझी संस्कृती नाही, हे मला अवश्य माहिती आहे, असेही त्यांनी सांगितले.  

टॅग्स :Prakash Rajप्रकाश राजramayanरामायणHinduismहिंदुइझमPoliticsराजकारण