तो अभिनेता म्हणाला, 'सबरीमाला मंदिरात येणा-या महिलांचे दोन तुकडे करा'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 05:00 PM2018-10-12T17:00:18+5:302018-10-12T17:00:26+5:30

सबरीमाला मंदिराचे दरवाजे सर्वोच्च न्यायालयानं महिलांसाठी खुले केल्यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. काहींनी न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे, तर काहींनी टीका केलीय.

actor kollam thulasi says women coming to sabarimala temple should be ripped in half | तो अभिनेता म्हणाला, 'सबरीमाला मंदिरात येणा-या महिलांचे दोन तुकडे करा'

तो अभिनेता म्हणाला, 'सबरीमाला मंदिरात येणा-या महिलांचे दोन तुकडे करा'

नवी दिल्ली- सबरीमाला मंदिराचे दरवाजे सर्वोच्च न्यायालयानं महिलांसाठी खुले केल्यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. काहींनी न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे, तर काहींनी टीका केलीय. त्यात आता एका अभिनेत्यानं महिलांच्या मंदिर प्रवेशावर वादग्रस्त विधान केलं आहे. मलयालम या चित्रपटातील अभिनेता कोल्लम थुलासी याच्या वादग्रस्त विधानानं एकच खळबळ उडाली आहे. थुलासीच्या मते, सबरीमाला मंदिरात येणा-या महिलांचे दोन तुकडे केले पाहिजेत. त्या महिलेचा एक भाग दिल्लीत पाठवला पाहिजे, तर दुसरा भाग तिरुअनंपूरममधल्या मुख्यमंत्री कार्यालयात फेकून दिला पाहिजे.

गेल्या काही दिवसांपूर्वीच सबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश करता येणार असल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं होतं. महिलांना देवाची पूजा करण्यावरही बंधनं घातली जातायत. देवाशी असलेलं नातं हे शारीरिक घटकावर ठरू शकत नाहीत, असंही सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिस्रा यांनी सांगितलं होतं. तसेच 10-50 वयोगटातील महिलांना मंदिरात जाण्यापासून रोखल्यास ते संवैधानिक तत्त्वांचे उल्लंघन करणारे ठरेल. सर्व भाविकांना देवाची पूजा करण्याचा समान अधिकार आहे. त्यासाठी स्त्री व पुरुषावरून भेदभाव करणं योग्य नसल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं होतं.



का होती मंदिरात प्रवेशबंदी? 
केरळमधील सबरीमाला मंदिरात 10 ते 50 वर्ष वयोगटातील महिलांना प्रवेश दिला जात नव्हता. विशेषत: 15 वर्षांहून अधिक वयाच्या मुलींना मंदिरात प्रवेश नाकारण्यात येत होता. केवळ लहान मुली आणि वृद्ध महिलांना या मंदिरात प्रवेश दिला जायचा. मंदिरात विराजमान असलेले अयप्पा ब्रम्हचारी होते, अशी श्रद्धा आहे. 

Web Title: actor kollam thulasi says women coming to sabarimala temple should be ripped in half

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.