अभिनेता अश्रफूल हकचे निधन

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:36+5:302015-02-18T00:13:36+5:30

अभिनेता अश्रफूल हकचे निधन

Actor Ashraful Haque passes away | अभिनेता अश्रफूल हकचे निधन

अभिनेता अश्रफूल हकचे निधन

िनेता अश्रफूल हकचे निधन
मुंबई
हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये अल्पावधितच आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारा अभिनेता अश्रफूल हक याचे मंगळवारी सकाळी अंधेरी येथील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. तो ४५ वर्षांचा होता. त्याच्या अचानक झालेल्या मृत्यूने बॉलिवूड आणि चाहत्यांना धक्का बसला आहे. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामातून पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अश्रफूल बॉलिवूडमध्ये नशिब आजमवण्यासाठी मुंबईत आला होता. त्याने अल्पावधीतच जंगल, ब्लॅक फ्रायडे फुकरे, दिवार, पान सिंग तोमर अशा सुमारे ३० चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याला बोन मॅरोशी संबंधीत असाध्य आजाराने ग्रासले होते. त्याच्यावर अंधेरीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तो अंधेरीत पत्नीसोबत राहत होता.

Web Title: Actor Ashraful Haque passes away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.