लायबेरियन जहाज बुडाल्याप्रकरणी कारवाई; मालक अन् क्रू'वर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 16:09 IST2025-06-11T16:00:05+5:302025-06-11T16:09:02+5:30

२४ मे रोजी, केरळच्या किनाऱ्यापासून सुमारे ३८ नॉटिकल मैल अंतरावर समुद्रात इंधन घेऊन जाणारे लायबेरियाचे एक कंटेनर जहाज बुडाले. आता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Action taken in Liberian ship sinking case Case of negligence filed against owner and crew | लायबेरियन जहाज बुडाल्याप्रकरणी कारवाई; मालक अन् क्रू'वर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल

लायबेरियन जहाज बुडाल्याप्रकरणी कारवाई; मालक अन् क्रू'वर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल

कोची किनाऱ्यापासून काही अंतरावर लायबेरियाचे जहाज बुडाल्याप्रकरणी केरळ पोलिसांनी कारवाई केली. एमएससी एल्सा ३ या जहाजाच्या नेव्हिगेशनमध्ये निष्काळजीपणा केल्याबद्दल पोलिसांनी जहाज मालक, मास्टर आणि क्रू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. २४ मे रोजी, सागरी इंधन वाहून नेणारे लायबेरियाचे कंटेनर जहाज कोची किनाऱ्यापासून सुमारे ३८ नॉटिकल मैल अंतरावर समुद्रात बुडाले होते. या जहाजामध्ये असलेले इंधन समुद्रात गळले होते.

पाकिस्तानात गृहयुद्ध! बलूचिस्तानात बंडखोरांसोबत झालेल्या झटापटीत पाक सैन्याचे २३ जवान ठार

या प्रकरणात पोलिसांनी बीएनएसच्या कलम २८२, २८५, २८६ (विषारी पदार्थाबाबत निष्काळजीपणा), २८७ (आग किंवा ज्वलनशील पदार्थाबाबत निष्काळजीपणा) आणि २८८ (स्फोटक पदार्थाबाबत निष्काळजीपणा) अंतर्गत गुन्हा दाखल केला. जहाज मालक, मास्टर आणि क्रू यांनी ज्वलनशील पदार्थ वाहून नेणाऱ्या जहाजाची हाताळणी करण्यात निष्काळजीपणा दाखवला होता, असं एफआयआरमध्ये म्हटले आहे. 

'समुद्रात वाहून जाणाऱ्या मालाचा परिसरातील मच्छीमार समुदायाच्या पर्यावरणावर आणि उपजीविकेवर परिणाम झाला. त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले, असं या एफआयआरमध्ये म्हटले आहे. अलप्पुझा जिल्ह्यातील सी शामजी नावाच्या व्यक्तीने केलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला.

जहाजावर ६४० कंटेनर होते

विझिंजम बंदरातून कोचीला जाणाऱ्या एमएससी एल्सा ३ नावाच्या १८४ मीटर लांबीच्या जहाजात ६४० कंटेनर होते. त्यापैकी १३ कंटेनर धोकादायक रसायनांनी भरलेले होते आणि १२ कंटेनरमध्ये कॅल्शियम कार्बाइड होते. याशिवाय, जहाजात सुमारे ८४.४४ मेट्रिक टन डिझेल आणि ३६७.१ मेट्रिक टन फर्नेस ऑइल होते. जहाज झुकल्याची माहिती मिळताच, भारतीय तटरक्षक दलाने कारवाई केली आणि २१ क्रू मेंबर्सना सुरक्षितपणे बाहेर काढले.

Web Title: Action taken in Liberian ship sinking case Case of negligence filed against owner and crew

टॅग्स :Keralaकेरळ