शहरं
Join us  
Trending Stories
1
"फडणवीसांनी पुणेकरांना दिशाभूल करणारी माहिती दिली"; FIR कॉपी दाखवत धंगेकरांचा गंभीर आरोप
2
बिल्डरचा प्रतापी बाळ कचाट्यात सापडणार; आज पुन्हा सुनावणी, पोलिसांनी मोठी तयारी केली
3
कपिल सिब्बलांच्या चुकीचा फटका? हेमंत सोरेन यांना धक्का; सुप्रीम कोर्टातील जामीन याचिका मागे!
4
...म्हणून तरी भारत-पाकिस्तानच्या सरकारने एकी दाखवावी; माजी खेळाडूचं रोखठोक मत
5
"आजच्या भारतात आडनावाला नाही तर, मेहनतीला महत्त्व," PM मोदींनी केलं Zomatoच्या मालकाचं कौतुक
6
"तिच्या मृत्यूनं आमचीही स्वप्न तुटली..."; पुणे अपघातातील मृत मुलीच्या बापाचा आक्रोश
7
निकालाच्या भविष्यवाणीवर प्रशांत किशोर-योगेंद्र यादवांमध्ये चढाओढ; भाजपाला किती जागा?
8
बड्यांच्या मुलांनी ‘रेस’मध्ये माझं अख्खं कुटुंबच चिरडलं, तरुणाचा आक्रोश; १५ दिवस झाले, कोणालाच अटक नाही
9
"त्याला बोट धरुन शिवसेनेत आणलं नाही, मुलासोबत टर्निंग पॉईंटला नव्हतो याची खंत"; गजानन किर्तीकर थेटच बोलले
10
"मतदानाच्या आधी दिल्लीचे पाणी..."; आपच्या नेत्या आतिशी यांचा मोठा आरोप
11
राज्याचे अहवाल, निवडणूक सर्वेक्षणामुळे भाजपमध्ये उत्साह; तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याचा दावा
12
'लेडी लक'ची चमक! पत्नी एलिसा स्टेडियममध्ये आली अन् मिचेल स्टार्कने मैदानावर कमाल केली...
13
"जान्हवी हे नाव म्हणजे ...", 'लेकी'च्या वाढदिवशी विश्वास नागरे पाटलांची खास पोस्ट
14
"एवढा आत्मविश्वास कुठून येतो"; उद्धव ठाकरेंच्या आरोपांवरुन राष्ट्रवादीची बोचरी टीका
15
Astro Tips: कासवाकृती अंगठीचा वापर लाभदायी, पण कोणत्या बोटात घालायची ते जाणून घ्या!
16
SEBI चा नवा नियम, आता ६ महिन्यांच्या सरासरीवरून ठरणार लिस्टेड कंपन्यांचं Market Cap
17
Mrunal Dusanis : "नीरजसारखा मुलगा आल्यावर मला वाटलं की..."; मृणाल दुसानिसने सांगितला 'तो' किस्सा
18
Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक, चांदीही घसरली; पाहा २२ मे रोजी किती घसरला भाव
19
“आदित्य ठाकरेंना CM करण्यासाठी रश्मी ठाकरेंचा आग्रह होता, पण शरद पवारांनी नकार दिला”
20
‘त्या’ने जिथे दारू प्यायली, त्या चोरडियांच्या ब्लॅक हॉटेलला टाळे; पंचशील इन्फ्रास्ट्रक्चरचे चोरडिया यांच्या नावाने आहे परवाना

NIA ची कारवाई; वर्षभरात 65 ISIS, 114 जिहादींसह विविध प्रकरणात 625 जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 6:14 PM

वर्षभरात NIAने दहशतवादी, गँगस्टर, ड्रग्स तस्कर आणि देशविरोधी काम करणाऱ्यांवर कारवाई केली.

नवी दिल्ली: राष्ट्रीय तपास संस्थे (NIA) ने 2023 मध्ये दहशतवादी, गँगस्टर, अंमली पदार्थांची तस्करी, मानवी तस्कर आणि राष्ट्रीय हिताच्या विरोधात काम करणार्‍या गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एनआयएच्या संपूर्ण देशभरातील कामकाजात अनेक पटींनी वाढ झाली. 2022 मध्ये अटक करण्यात आलेल्या 490 आरोपींच्या तुलनेत, एनआयएने या वर्षी एकूण 625 जणांना अटक केली. 

यामध्ये ISIS प्रकरणांमध्ये 65, जिहादी प्रकरणांमध्ये 114, मानवी तस्करी प्रकरणात 45, दहशतवाद आणि संघटित गुन्हेगारी कारवायांमध्ये 28, डाव्या विचारसरणीचे अतिरेकी (LWE) प्रकरणांमध्ये 76 आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये दोषी ठरविण्याचे प्रमाण 94.70% होते, तर आरोपींकडून 56 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली. वर्षभरात NIA साठी सर्वात मोठे यश ISIS, काश्मिरी आणि इतर जिहादी तसेच देशात कार्यरत असलेल्या वाढते दहशतवादी नेटवर्क यांच्या विरोधात होते. 

94.70% प्रकरणांमध्ये शिक्षा 2023 मध्ये दोषी ठरलेल्या 74 आरोपींना शिक्षा म्हणून 'सश्रम कारावास' आणि 'दंड' अशा विविध शिक्षा सुनावण्यात आली. एजन्सीने 94.70% चा एक मजबूत दोषसिद्धीचा दर राखला आहे. एजन्सीने भारत-पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवरुन 102 किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या प्रमुख फरार आरोपीला अटक केल्याने या संदर्भात सर्वात मोठे यश मिळाले.

2023 मध्ये 1040 छापे टाकलेNIA द्वारे शोध आणि छाप्यांमध्ये देखील मागील वर्षाच्या तुलनेत लक्षणीय वाढ नोंदवली गेली. छाप्यांची संख्या 2022 मध्ये 957 वरुन 2023 मध्ये 1040 पर्यंत वाढ झाली. देशभरातील जिहादविरोधी कारवाई NIA साठी 2023 मध्ये एक मोठी उपलब्धी ठरली. यामध्ये ISIS च्या देशभरातील मॉड्यूल्सचा पर्दाफाश झाला. डिसेंबरमध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील 44 ठिकाणी छापे टाकून एकूण 15 आरोपींना अटक करण्यात आली होती, ज्यातून मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी साहित्यही जप्त करण्यात आले होते. अशाप्रकारे वर्षभरात एनआयएने विविध कारवायांमध्ये शेकडो आरोपींच्या मुसक्या आवळल्या आणि मोठे दहशतवादी नेटवर्क उद्धवस्त केले.

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणाCrime Newsगुन्हेगारीTerrorismदहशतवादCentral Governmentकेंद्र सरकार