हिंदीच्या पेपरला सात जणांवर कारवाई
By Admin | Updated: February 22, 2016 19:28 IST2016-02-22T19:28:28+5:302016-02-22T19:28:28+5:30
जळगाव : उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या हिंदी परीक्षेच्या पेपरला कॉपी करणार्या सात विद्यार्थ्यांवर भरारी पथकाने कारवाई केली. यात पाचोर्याचे चार तर धरणगावच्या तीघांचा समावेश आहे.

हिंदीच्या पेपरला सात जणांवर कारवाई
ज गाव : उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या हिंदी परीक्षेच्या पेपरला कॉपी करणार्या सात विद्यार्थ्यांवर भरारी पथकाने कारवाई केली. यात पाचोर्याचे चार तर धरणगावच्या तीघांचा समावेश आहे. बारावी परीक्षेच्या हिंदीच्या पेेपरला कॉपी करणार्या एम.एम. महाविद्यालय पाचोरा केंद्रातील चार तर कला वाणिज्य महाविद्यालय धरणगाव केंद्रातील तीन विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई शिक्षणाधिकारी (माध्य) डी.पी. महाजन व शिक्षणाधिकारी (निरंतर)लता बागुल यांच्या भरारी पथकाने केली. परीक्षेच्या सुरुवातीपासूनच पथकांद्वारे नियमित कारवाई सुरु आहे. आतापर्यंत १७ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. अजूनही कारवाई सुरूच राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.