कठड्याअभावी वाढले अपघात
By Admin | Updated: May 25, 2015 02:11 IST2015-05-25T02:11:35+5:302015-05-25T02:11:35+5:30
वडगाव काशिंबेग बंधारा रस्ता धोकादायक

कठड्याअभावी वाढले अपघात
व गाव काशिंबेग बंधारा रस्ता धोकादायकमंचर : वडगाव काशिंबेग (ता.आंबेगाव) येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्याचा साकोरे बाजूकडील भाग धोकादायक बनला आहे. येथे सुरक्षिततेसाठी कठडा नसल्याने अनेक वाहने बंधार्यात कोसळली आहेत.घोडनदीवर वडगाव काशिंबेग येथे कोल्हापूर पद्धतीचा बंधारा आहे. या बंधार्यावरून दुचाकी वाहने ये-जा करीत असतात. येथे पूल व्हावा, अशी ग्रामस्थांची अनेक दिवसांची मागणी आहे. वडगावमार्गे बंधार्यावरुन साकोरे महाळुंगे पडवळ येथील नागरिक ये-जा करतात. हा नजीकचा मार्ग असल्याने या गावातील नागरिकांची सतत वर्दळ असते.कोल्हापूर पद्धतीच्या या बंधार्याला दोन्ही बाजूला संरक्षक कठडे आहेत. मात्र, साकोरे गावच्या बाजूला धोकादायक स्थिती आहे. बंधारा संपल्यानंतर येथे अरुंद रस्ता होतो. तेथून दुचाकी गाडी पुढे काढणे जिकिरीचे बनते. शिवाय घोडनदी पाणीसाठा असलेल्या बाजूला संरक्षक भिंत नाही. साकोरे गावाच्या बाजूने वाहने आली की त्यांना बंधार्यावर येण्यासाठी वळावे लागते. मात्र, तेथेच कुठलीही सुरक्षा नसल्याने वाहनचालक वाहनांसह बंधार्यात पडल्याच्या घटना घडल्या आहेत.पावसाळ्यात हा रस्ता अधिकच धोकादायक बनतो. साकोरे बाजूच्या या वळणावर वाहने चालविणे अवघड बनले आहे. बंधार्याच्या या भागात भर टाकून संरक्षक कठडे बसविण्याची मागणी सरपंच विनोद मोढवे व श्रीकृष्ण पतसंस्थेचेे तज्ज्ञ सल्लागार महेश डोके यांनी केली आहे.फोटो : घोडनदीवरील वडगाव काशिंबेग येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्यावर साकोरे बाजूकडील भाग धोकादायक बनला आहे.