म्यानमारच्या कोलकातामधील वाणिज्यदूतांचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 05:22 IST2017-10-28T05:22:21+5:302017-10-28T05:22:27+5:30

गिरिदिह (झारखंड) : म्यानमारचे कोलकातामधील महावाणिज्यदूत (कॉन्सल जनरल) पीई सो यांचा भीषण अपघातात मृत्यू झाला.

Accidental death of infantry in Myanmar's Kolkata | म्यानमारच्या कोलकातामधील वाणिज्यदूतांचा अपघाती मृत्यू

म्यानमारच्या कोलकातामधील वाणिज्यदूतांचा अपघाती मृत्यू


गिरिदिह (झारखंड) : म्यानमारचे कोलकातामधील महावाणिज्यदूत (कॉन्सल जनरल) पीई सो यांचा भीषण अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या वाहनाची ट्रकशी टक्कर होऊ झालेल्या अपघातात त्यांच्या पत्नीसह अन्य तीन जण जखमी झाले आहेत.
पीई सो (४९) हे गयेहून (बिहार) कोलकात्याला येत असताना शुक्रवारी निमियाघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीत गलागीनजीक जीटी रोडवर हा अपघात घडला. यात पीई सो यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी नेओ, खाजगी सल्लागार टिंगंग आणि चालक विपिन सिंग या तिघांची प्रकृती धोक्याबाहेर असून, त्यांना रांची येथील इस्पितळात दाखल करण्यात आले आहे, असे पोलीस अधीक्षक अखिलेश बेरिआर यांनी सांगितले. मागच्या वर्षी ६ डिसेंबर रोजी पीई सो यांची कोलकात्यात महावाणिज्यदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दुचाकीची धडक चुकविण्याच्या प्रयत्नात त्यांचे वाहन समोरून येणाºया ट्रकला धडकले. ट्रकचालक आणि त्याच्या सहायकाला अटक केली.

Web Title: Accidental death of infantry in Myanmar's Kolkata

टॅग्स :Accidentअपघात