दोन तरुण रस्त्यातून चालत आहेत. अचानक पाठीमागून पांढऱ्या रंगाची कार येते आणि दोघांना उडवते. अचानक धडक बसल्यानंतर दोन्ही तरुण बोनटवर आदळतात आणि त्यानंतर दोघेही खाली पडतात. त्यानंतर त्यांच्या अंगावरून कार जाते. यात एक तरुण जागीच ठार झाला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
राजस्थानातील नागौर शहरात ही घटना घडली आहे. अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या दोन तरुणांना कारने उडवले आहे, ते दूध आणण्यासाठी निघाले होते. रस्त्यावरून चालत जात असताना दोघांना पाठीमागून आलेल्या एका कारने त्यांना धडक दिली.
कारने उडवल्यानंतर ते दोघेही बोनेटवर पडले. त्यानंतरही कार थांबली नाही. कार पुढे गेल्यानंतर दोघेही खाली पडले आणि कारच्या चाकाखाली आले. यात एक तरूण कारखाली चिरडला गेला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुसराही चाकाखाली आला, पण तो पटकन बाहेर आला.
दुसरा तरुण जखमी झाला. तर पहिला तरुण चाकाखालीच अडकल्याने चिरडत गेला. त्यात त्याचा मृत्यू झाला. अपघात कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
कार अपघाताचा व्हिडीओ बघा
रस्त्याच्या कडेला असलेल्या या कॅमेऱ्यात हा अपघात कैद झाला आहे. हा अपघात झाल्यानंतर आजूबाजूच्या दुकानातील घरातील लोक बाहेर आले. तर कारमधील लोकही खाली उतरले. त्यानंतर जखमी आणि मृत तरुणाला रुग्णालयात नेण्यात आले. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.