शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Accident:अर्ध्यावरती डाव मोडला... कार खोल दरीत कोसळून तरुण पती-पत्नीचा मृत्यू, तिघे जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 14:18 IST

Accident News: हिमाचल प्रदेशमधील मंडी जिल्ह्यामध्ये झालेल्या भीषण कार अपघातामध्ये तरुण पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. मंगळवारी संध्याकाळी हा भीषण अपघात घडला

सुंदरनगर (हिमाचल प्रदेश) - हिमाचल प्रदेशमधील मंडी जिल्ह्यामध्ये झालेल्या भीषण कार अपघातामध्ये तरुण पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. मंगळवारी संध्याकाळी हा भीषण अपघात घडला. मंडी मधील सुंदरनगर उपविभागातील निहरी भागात एक कार खोल दरीत  कोसळली. या अपघातात पतीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर पत्नीचा रुग्णालयात मृत्यू झाला. या अपघातामध्ये कारमधून प्रवास करणारे तिघे अन्य प्रवासी जखमी झाले. त्यांच्यावर सिव्हील रुग्णालय, सुंदरनगर येथे सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार निहरी क्षेत्रातील पंडारमध्ये एक कार खोल दरीत कोसळली. कारमध्ये पाच जण प्रवास करत होते. या अपघातानंतर जखमींना उपचारासाठी सीएचसी रोहांडा येथे नेण्यात आले. येथे ३३ वर्षीय इंद्र सिंह यांनी उपचारादरम्यान प्राण सोडले. तर अन्य जखमींची गंभीर प्रकृती पाहून त्यांना सुंदरनगर येथील रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यानंतर उपचारादरम्यान, रात्री उशिरा इंद्र सिंह यांच्या २७ वर्षीय पत्नीनेही प्राण सोडले.

दरम्यान, या भीषण अपघातामध्ये डोलाराम (४०), प्रभा देवी (३२) आणि रुहीन (७) हे जखमी झाले. त्यांच्यावर सुंदरनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरू आहे. तसेच शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सुपुर्द केले जातील, असे पोलिसांनी सांगितले.  

टॅग्स :AccidentअपघातCrime Newsगुन्हेगारीHimachal Pradeshहिमाचल प्रदेशFamilyपरिवार