Accident: भरधाव स्कॉर्पियो रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात उलटली, ३ जणांचा मृत्यू, तिघे जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 20:56 IST2022-05-11T20:55:26+5:302022-05-11T20:56:59+5:30
Accident: बिहारमधील वैशाली जिल्ह्यामध्ये वेगवान स्कॉर्पिओ खड्ड्यात पलटली. या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य तिघे जखमी झाले आहेत. ही घटना महनार हाजीपूर मार्गावरील चांदपुरा ओपी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चकमगोलाजवळ घडली.

Accident: भरधाव स्कॉर्पियो रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात उलटली, ३ जणांचा मृत्यू, तिघे जखमी
पाटणा - बिहारमधील वैशाली जिल्ह्यामध्ये वेगवान स्कॉर्पिओ खड्ड्यात पलटली. या अपघातामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य तिघे जखमी झाले आहेत. ही घटना महनार हाजीपूर मार्गावरील चांदपुरा ओपी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चकमगोलाजवळ घडली. अपघातग्रस्त स्कॉर्पिओवर शिक्षण विभागाचा बोर्ड लागलेला होता. या अपघाताची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात पाठवले आहे.